Army Dainik Gomantak
अर्थविश्व

One Rank One Pension Scheme बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 लाख लोकांना होणार फायदा

One Rank One Pension Scheme Revised: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेत वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

One Rank One Pension Scheme Revised: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेत वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा केली आहे. यासंबंधीची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 'वन रँक वन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली असून यापूर्वी 20.60 लाख पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता सुधारणा केल्यानंतर 25 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे.' 8500 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांसोबतच युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि अपंग निवृत्ती वेतनधारकांनाही OROP चा लाभ मिळणार आहे.' यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 8500 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2019 ते जून 2022 या कालावधीची थकबाकी देखील दिली जाईल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, 'या अंतर्गत जुलै 2019 ते जून 2022 या कालावधीची थकबाकी देखील दिली जाईल, ज्यामध्ये 23,638.07 कोटी रुपयांची रक्कम आहे.' याचा लाभ सर्व संरक्षण दलातील सेवानिवृत्त आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वन रँक वन पेन्शन योजना म्हणजे काय?

वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) म्हणजे सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख विचारात न घेता समान श्रेणी आणि समान सेवा कालावधीसाठी समान पेन्शनचे पेमेंट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT