Bank
Bank 
अर्थविश्व

मोदी सरकारने 2 मोठ्या बँकांच्या खासगीकरणाचा का घेतला निर्णय?

गोमन्तक वृत्तसेवा

Bank Privatisation:​ केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीसाठी(Disinvestment) दोन बँकांना शोर्टलिस्ट केले आहे. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया(Central bank of India) आणि इंडियन ओव्हरसीज बँक(Indian Overseas Bank) यांचा समावेश आहे. सीएनबीसी(CNBC) च्या अहवालानुसार निर्गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरकार दोन्ही बँकांची 51 टक्के हिस्सेदारी विकू शकणार आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील बदलांबरोबरच केंद्र सरकारदेखील निर्गुंतवणुकीसाठी काही इतर कायद्यांमध्ये बदल करेल. तसेच आरबीआयशी चर्चा होणार असे सांगितले जात आहे.

एनआयटीआय आयोगाने निर्गुंतवणुकीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नावांची शिफारस केली होती. खासगीकरणासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा कंपनीची नावे निवडण्याची जबाबदारी या कमिशनवर सोपविण्यात आली होती.

दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये आज 20% पर्यंत वाढ

निर्गुंतवणुकीच्या बातमीनंतर दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये आज 20% पर्यंत वाढ दिसून आली आणि अप्पर सर्किटला फटका बसला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर 20 टक्क्यांनी वधारून 24.30 रुपयांवर, तर इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर 19.80% वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांकी 23.60 रूपयांच्या पातळीवर वर बंद झाला.

फेब्रुवारीमध्ये 4 नाव पुढे आली होती

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. वित्तीय वर्ष 2022 साठी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने खासगीकरणासाठी 4 मिड साइझ बँकांना शॉर्टलिस्ट केले होते, त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया , इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या 4 पैकी 2 बँकांचे खाजगीकरण केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT