Amul Milk Price Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

Milk Price Hike: महागाईचा भडका! Amul-मदर डेअरीच्या दुधाचे दर वाढले, घ्या जाणून

राज्यात दूध पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या अमूल कंपनीने आपल्या दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशामध्ये पुन्हा पुन्हा महागाईचे धक्के जनतेला जाणवत आहेत. राज्यात दूध पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या अमूल कंपनीने, आपल्या दुधाच्या दरांमध्ये वाढ (Amul Milk Price Hike) करण्याची घोषणा केली आहे. अमूल दुधाची विक्री करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमूल दुधाच्या दरात 4 टक्क्यांनी वाढ केली असून, आता दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागणार आहे. याशिवाय मदर डेअरीनेही दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केल्याने दिल्ली-एनसीआरमधील लोकांना याचा मोठा धक्का बसला आहे. (Milk Price Hike Outbreak of inflation Amul Mother Dairy milk prices hiked know)

किमती कधी आणि किती वाढल्या आहेत ,

अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताझा यांच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दर वाढले आहेत. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाचे नवीन दर उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. यानंतर आता अमूल गोल्डचा दर 62 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताझा 50 रुपये प्रति लिटरवर पोहोचणार आहे. अर्धा किलो अमूल गोल्डच्या पॅकेटची किंमत 31 रुपये आणि अमूल फ्रेशची किंमत 25 रुपये असणार आहे. त्याचबरोबर अमूल शक्तीच्या अर्ध्या किलोच्या पॅकेटची किंमत 28 रुपये असणार आहे.

जाणून घ्या किती महाग आहे मदर डेअरीचे दूध.

या वाढीनंतर मदर डेअरीचे फुल क्रीम मिल्क आता 61 रुपये प्रति लिटर मिळणार आहे तर पूर्वी 59 रुपये प्रतिलिटर मिळत होते. तसेच दुसरीकडे टोन्ड दूध आता 45 रुपयांऐवजी 51 रुपये प्रतिलिटर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर गायीचे दूध आता 53 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. दरम्यान टोकन दूध देखील आता 46 रुपयांऐवजी 48 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

अमूलच्या दुधाचे भाव कुठे वाढले आहेत,

अहमदाबाद आणि सौराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि गुजरातमध्ये इतर ठिकाणी दूध महाग होणार आहेत. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन अमूल ब्रँड अंतर्गत पॅकेज केलेले आणि ताजे दूध जेथे विकते, तेथे दुधाची किंमत प्रति लिटर 2 रुपयांनी वाढणार आहे.

अमूलने भाव का वाढवले

​​कंपनीचा एकूण खर्च आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्याने कंपनीने दुधाच्या दरात वाढ केल्याचे अमूलच्या कंपनीने सांगितले आहे. गुरांना चारा देण्याच्या खर्चात वर्षानुवर्षे 20 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीला हा खर्च ग्राहकांना द्यावा लागणार आहे तसेच गतवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भावातही 8 ते 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याआधी मार्चमध्ये कंपनीने दरात वाढ केली होती,

याआधी अमूलने पॅकबंद आणि ताज्या दुधाच्या किमतीत मार्चमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यामागे कंपनीने महागडे पेट्रोल आणि डिझेलमुळे वाहतुकीच्या वाढलेल्या किमतींचा हवाला देखील दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT