Meta Fined 25 Billion Dollars Dainik Gomantak
अर्थविश्व

Meta Fined 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Meta 25 Billion Dollar Penalty in Data Privacy: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मालकी असणारी टेक दिग्गज कंपनी 'मेटा' पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडली.

Manish Jadhav

Meta Fine: $25 Billion Penalty in Data Privacy Case: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मालकी असणारी टेक दिग्गज कंपनी 'मेटा' पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडली. अमेरिकेतील एका कोर्टाने डेटा प्रायव्हसीच्या गंभीर प्रकरणात मेटाला तब्बल 25 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 2.36 लाख कोटींचा दंड ठोठावला. अमेरिकेच्या इतिहासामध्ये एखाद्या कंपनीविरुद्ध राज्य पातळीवर घेण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा आणि कठोर निर्णय मानला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सिलिकॉन व्हॅलीसह जगभरातील टेक जगतात खळबळ उडाली.

दरम्यान, हा संपूर्ण वाद गाजलेल्या 'केंब्रिज एनालिटिका' डेटा लीक स्कॅंडलशी जोडलेला आहे. या प्रकरणी आरोप होता की, एका ब्रिटिश फर्मने थर्ड-पार्टी ॲपच्या माध्यमातून सुमारे 8 कोटी 70 लाख फेसबुक (Facebook) युजर्सची खासगी माहिती त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे मिळवली. या खासगी डेटाचा वापर नंतर राजकीय जाहिराती आणि युजर्सच्या अचूक प्रोफायलिंगसाठी करण्यात आला.

न्यू मेक्सिकोच्या कोर्टाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, मेटाने आपल्या ग्राहकांना त्यांच्या खासगी डेटाची सुरक्षा आणि वापराबाबत पूर्णपणे अंधारात ठेवले आणि त्यांची फसवणूक केली. सप्टेंबर 2026 मध्ये कंपनीने स्वतःच्या बचावासाठी कोर्टात जे युक्तिवाद मांडले, ते न्यू मेक्सिकोच्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अत्यंत दिशाभूल करणारे असल्याचे सिद्ध झाले. कोर्टाच्या मते, कंपनी आणि तिच्या नेतृत्वाद्वारे देण्यात आलेल्या 29 वक्तव्यांपैकी तब्बल 26 वक्तव्ये ही पूर्णपणे दिशाभूल करणारी होती. या चुकीच्या वक्तव्यांमुळे न्यू मेक्सिकोच्या ग्राहक संरक्षण कायद्याचे तब्बल 4 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा उल्लंघन झाले.

या कायद्यानुसार प्रत्येक उल्लंघनासाठी 5 हजार डॉलरपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद होती, ज्यामुळे हा आकडा थेट 219 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकला असता. मात्र, सुनावणी करणारे न्यायाधीश फ्रान्सिस मॅथ्यू यांनी थोडा दिलासा देत ही मोठी रक्कम कमी करुन 25 अब्ज डॉलरवर आणली. कोर्टाच्या या निर्णयानुसार, या दंडात्मक कारवाईतून गोळा होणारा पैसा राज्याच्या शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.

दुसरीकडे, या दंडानंतर मेटाने कोर्टाच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. कंपनीचे मुख्य कायदेशीर अधिकारी सीजे महोनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मेटा या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात अपील करणार आहे. कंपनीच्या मते, हा दंड आणि लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार व अनुचित आहेत. असे असले तरी, भविष्यात युजर्सच्या डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावर टेक कंपन्यांसाठी हा निर्णय एक मोठी आणि कडक कायदेशीर चेतावणी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

SCROLL FOR NEXT