Why A US Startup Fired Its Entire Workforce Dainik Gomantak
अर्थविश्व

2 मिनिटांच्या कॉलमध्ये इतक्या कर्मचाऱ्यांना टाकले काढून; स्टार्टअपने कंपनीने असे पाऊल का उचलले?

Why A US Startup Fired Its Entire Workforce: अमेरिकन स्टार्टअप ही या वर्षी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली कंपनी ठरली आहे.

Manish Jadhav

Why A US Startup Fired Its Entire Workforce: अमेरिकन स्टार्टअप ही या वर्षी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली कंपनी ठरली आहे. Frontdesk नावाच्या या स्टार्टअपने 2 जानेवारी रोजी व्हर्च्युअल कॉल दरम्यान आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना काढून टाकले. या कंपनीत 200 लोक काम करत होते. FrontDesk ची स्थापना 2017 मध्ये झाली होती. हे एक प्रोपटेक किंवा प्रॉपर्टी टेक्नॉलॉजी स्टार्टअप आहे. गेल्या मंगळवारी दोन मिनिटांच्या गुगल मीट कॉल दरम्यान कंपनीने आपले सर्व फुल टाइम, पार्ट टाइम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. ही कंपनी संपूर्ण अमेरिकेत 1000 हून अधिक फर्निश्ड अपार्टमेंटचे व्यवस्थापन करत होती.

कंपनीने असे पाऊल का उचलले?

फ्रंटडेस्कचे सीईओ जेसी डीपिन्टो यांनी कॉल दरम्यान कर्मचार्‍यांना सांगितले की, कंपनी स्टेट रिसीवरशिपसाठी दावा दाखल करेल, जो दिवाळकोरीचा पर्याय आहे. या स्टार्टअपने संपूर्ण बिल्डींग मॅनेज करण्याच्या आपल्या योजनेबद्दल गुंतवणूकदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. फ्रंटडेस्कने गुंतवणूकदारांकडून सुमारे $26 दशलक्ष (सुमारे 216 कोटी रुपये) उभे केले होते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये जेटब्लू व्हेंचर्स, वेरिटास इन्व्हेस्टमेंट्स आणि सँड हिल एंजल्स सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश होता. पण गुंतवणूकदार कंपनीच्या नव्या योजनेशी सहमत नव्हते. याचा परिणाम असा झाला की, फ्रंटडेस्कला त्याचे काम थांबवावे लागले.

बिझनेस मॉडेल फ्लॉप होत होते

दरम्यान, या स्टार्टअपचे बिझनेस मॉडेल बाजार रेंटल रेट्समध्ये अपार्टमेंट भाड्याने देणे आणि त्याला फर्निश्ड करणे आणि त्यांना अल्प कालावधीसाठी भाड्याने देणे हे होते. परंतु कंपनीला अपार्टमेंट्स फर्निश्ड करण्यासाठी खूप खर्च करावा लागला आणि त्यानुसार कमाई होऊ शकली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचाही त्यात रस कमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT