Many taxpayers are getting Scammed On The Name Of ITR Refund. Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR Refund Scam: आयटीआर रिफंडच्या नावावर फसवणूक; या गोष्टी पाळा अन् अर्थिक संकट टाळा

ITR Refund: अनेक करदात्यांना आयटीआर रिफंडच्या नावाने मेसेज येत आहेत. ही एक प्रकारची फसवणूक आहे. या प्रकारची फसवणूक टाळायची असल्यास नागरिकांनी महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत.

Ashutosh Masgaunde

Many taxpayers are getting Scammed On The Name Of ITR Refund:

देशातील सर्व करदात्यांना रिटर्न भरणे अनिवार्य झाले आहे. अनेक करदात्यांनी 31 जुलै 2023 रोजी रिटर्न भरले आहेत.

जर तुम्ही अद्याप रिटर्न भरले नसेल, तर तुम्ही 31 डिसेंबर 2023 पूर्वी रिटर्न भरावे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना बँक खाते, क्रेडिट कार्ड किंवा केवायसीशी संबंधित मेसेज येत आहेत. ज्याद्वारे लोकांना आयटीआर रिफंडचे अमिष दाखवत फसवणूक केली जात आहे.

अनेकांना येत असलेले हे सर्व मेसेज खरे असतीलच असे नाही. अनेक मेसेजमधून फसवणूकही होत आहे.

अशा परिस्थितीत फसवणुकीचे असे प्रकार आजकाल नव्याने घडत आहेत. ही फसवणूक बहुतांश करदात्यांची होत आहे.

अनेक करदात्यांना त्यांचा आयटीआर रिफंड मंजूर झाल्याचे संदेश येत आहेत. आयटीआरची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे . यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा बँक खाते क्रमांक अपडेट करा. अशा संदेशांचा वापर फसवणुकीसाठी केला जातो.

पीआयबी फॅक्ट-चेकमध्ये असे म्हटले आहे की आयकर विभाग करदात्याला आयटीआर संबंधित कोणतीही लिंक कधीही शेअर करत नाही.

अशा परिस्थितीत करदात्यांनी याची माहिती ठेवायला हवी. याशिवाय त्यांनी आपली बँक माहिती कोणत्याही अनोळखी वेबसाइटला देणे टाळावे. तुमचा बँक तपशील चोरण्यासाठी हा फिशिंग घोटाळा असू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • आयकर विभाग ई-मेलद्वारे देखील कोणतीही माहिती विचारत नाही. याशिवाय विभागाकडून पिन क्रमांक, पासवर्ड, क्रेडिट कार्ड, बँक खाते यांच्या माहितीसाठी कोणताही ई-मेल येत नाही.

  • कोणत्याही करदात्याला कधीही विभागाच्या नावाने मेल प्राप्त झाल्यास त्याला कधीही प्रतिसाद देऊ नका.

  • ई-मेलमध्ये दिलेली कोणतेही लिंक कधीही उघडू नका. त्यात काही कोड असू शकतात ज्यामुळे तुमचा कंप्युटर हॅक होऊ शकतो.

  • तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर, अँटी स्पायवेअर आणि फायरवॉल वापरावे. यासोबतच ते अपडेटही ठेवावे.

  • फिशिंग ई-मेलमध्ये काही सॉफ्टवेअर देखील असतात जे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. या प्रकरणात, अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर, अँटी-स्पायवेअर आणि फायरवॉल आपल्या संगणकाचे संरक्षण करतील.

फसवणूक झाल्यास काय करावे?

अशी कोणतीही फसवणूक आपल्यासोबत घडल्यास आपण प्रथम सायबर सेलला त्याची माहिती द्यावी.

जेव्हा कधी अशी फसवणूक (Scam) होते तेव्हा आपन घाबरून जातो आणि नंतर पोलिस किंवा सायबर सेलकडे तक्रार करतो.

दुसरीकडे, आम्ही त्वरित तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. सायबर सेलला फसवणुकीची कोणतीही तक्रार येताच ते प्रथम त्याची चौकशी करतात.

तुमच्या खात्यातून काढलेले पैसे ज्या खात्यात ट्रान्सफर केले जातात ते खाते सायबर सेल (Cyber Police) फ्रीज करते. अशा परिस्थितीत, ते खाते असलेली व्यक्ती कोणत्याही व्यवहारासाठी बँक खाते वापरू शकणार नाही. त्यानंतर सायबर सेल त्या बँक (Bank) खात्याची तपासणी करतो.

अशा प्रकारे, तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT