FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Mahila Samman Savings Certificate: महिलांसाठी अर्थमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, ऐकून तुम्हीही म्हणाल...!

FM Nirmala Sitharaman: आता तुम्ही कोणत्याही खाजगी आणि सरकारी बँकेत या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

Manish Jadhav

Mahila Samman Savings Certificate: देशभरातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ची अंमलबजावणी आणि विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही खाजगी आणि सरकारी बँकेत या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने 27 जून 2023 रोजी जारी केलेल्या ई-गॅझेट अधिसूचनेद्वारे हे नियम जारी केले आहेत.

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या योजनेचा मुली/महिलांपर्यंत पोहोच वाढवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा प्रकारे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे सदस्यत्व आता पोस्ट ऑफिससह पात्र शेड्युल्ड बँकांमध्ये घेता येईल.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती

महिलांमध्ये बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेली ही योजना 1 एप्रिल 2023 पासून पोस्ट विभागामार्फत लागू आहे.

देशातील प्रत्येक मुलीला आणि महिलेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Budget) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना जाहीर केली होती.

7.7 टक्के व्याज मिळेल

या योजनेअंतर्गत, जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल, जे तिमाही आधारावर जोडले जाईल. अशा प्रकारे प्रभावी व्याज दर सुमारे 7.7 टक्के असेल.

किमान 1000 रुपयांपासून सुरुवात करु शकता

त्याचबरोबर, 100 च्या पटीत कोणतीही रक्कम किमान रु. 1000 आणि कमाल रु. 2 लाखांच्या मर्यादेत जमा केली जाऊ शकते. या योजनेतील गुंतवणुकीची (Investment) परिपक्वता ही योजनेअंतर्गत खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांची आहे. या योजनेअंतर्गत, 31 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT