LPG cylinders News, Book LPG through voice message News Dainik Gomantak
अर्थविश्व

आता 'व्हॉइस मेसेज'द्वारेही बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंट सुविधाही सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

सतत अपग्रेड होत जाणाऱ्या तंत्रज्ञानासोबतच आपले जीवनही सुसह्य होत आहे. गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) बुकिंगसाठी गॅस एजन्सीच्या लाईनमध्ये तासनतास उभं राहायचं ही बाब फार जुनी नाहीये. पण आज तोच गॅस सिलेंडर मिस्ड कॉल किंवा मेसेजने सहजरित्या बुक होतो. पैसे ऑनलाइन जमा होतात आणि गॅस सिलिंडर दुसऱ्या-दोन दिवसांत घरीही पोच होतो. (LPG cylinders can now be booked through voice message)

आता या प्रकरणात आणखी नवीन तंत्रांचा शोध लागला आहे. यामध्ये, सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने गॅस (LPG) सिलिंडर बुक करण्यासाठी व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंट सुविधाही सुरू केली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही, ते गॅस सिलिंडर बुक करू शकतात आणि बेसिक फोनवरून व्हॉइस मेसेज पाठवून सहजरित्या पेमेंट करू शकता. (LPG cylinders News)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI123PAY लाँच करण्याची घोषणा केली. UPI123PAY सेवा सुरू करणारी BPCL ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

ही सेवा अशी कार्य करेल

BPCL ने व्हॉइस आधारित डिजिटल पेमेंट सुविधा प्रदान करण्यासाठी अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडशी भागीदारी केली असल्याचे समोर आले आहे. या सुविधेसह, भारत गॅसचे ग्राहक UPI123PAY द्वारे त्यांचे LPG सिलेंडर बुक करू शकतात आणि पैसेही देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT