PAN Card Dainik Gomantak
अर्थविश्व

PF अकाऊंटशी PAN लिंक करा नाहीतर...

टीडीएसची रक्कम 5000 राहिली, तर पीएफ ग्राहकांच्या खात्यातील क्रेडिट व्याजातून कोणतीही कपात केली जाणार नाही.

दैनिक गोमन्तक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मधून पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवरील कराच्या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे विशेषत: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेतnज्यांचे पीएफ खात्यात वर्षभरात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रक्कम जमा करण्याची मर्यादा 5 लाख रुपये आहे. (Link PAN to PF Account)

ईपीएफओच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक योगदान असलेली पीएफ खाती अंतिम सेटलमेंट किंवा हस्तांतरणाच्या स्थितीत नसल्यास, व्याज क्रेडिटच्या दिवशी या खात्यांमधून टीडीएसची रक्कम कापली जाईल.

खातेदाराच्या मृत्यूनंतरही टीडीएस लावला जाईल, असे ईपीएफओने (EPFO) म्हटले आहे. याचे कारण स्पष्ट करताना ईपीएफओने ते जिवंत सदस्यासाठी असल्याचे सांगितले आहे. यासोबतच भारतीय कामगारांप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगारांनाही टीडीएस लागू होणार आहे.

पीएफ खात्याशी पॅन लिंक नसल्यास..
जर एखाद्या व्यक्तीचे वैध पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडलेले असेल तर त्याला 10 टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. त्याच वेळी, जर पीएफ (PF) खाते पॅनशी जोडलेले नसेल, तर त्या व्यक्तीला 20 टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. याचा अर्थ असा की जर पॅन पीएफ खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला जवळपास दुप्पट कर भरावा लागेल. मात्र, जर टीडीएसची रक्कम 5000 राहिली, तर पीएफ ग्राहकांच्या खात्यातील क्रेडिट व्याजातून कोणतीही कपात केली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT