LIC  Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC Dhan Sanchay Policy: LIC ने लॉन्च केली नवी पॉलिसी, लगेच करा गुंतवणूक

LIC Dhan Sanchay Policy: एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते.

दैनिक गोमन्तक

LIC Dhan Sanchay Saving Plan Launch: एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते. पुन्हा एकदा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने धनसंचय बचत योजना नावाची नवीन विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. ही योजना 14 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली आहे. म्हणजेच, तुम्ही त्यात गुंतवणूक करु शकता. एलआयसी धनसंचय पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, पॉलिसीच्या कालावधीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. एवढेच नाही तर पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर पेआउट कालावधीत हमी उत्पन्न देखील मिळते.

5 ते 15 वर्षांची योजना

एलआयसीने (LIC) दिलेल्या माहितीनुसार, या खास पॉलिसीमध्ये, योजनेच्या मॅच्युरिटीच्या तारखेनंतर पेमेंट करताना हमी दिलेले फायदे दिले जातील. याव्यतिरिक्त, गॅरंटीड टर्मिनल फायदे देखील दिले जातील. ही योजना 5 वर्षे ते कमाल 15 वर्षांसाठी आहे. त्यातून निश्चित उत्पन्नाचे फायदे मिळतील. इतकेच नाही तर वाढीव उत्पन्न लाभ, सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट्स आणि सिंगल प्लॅनची ​​सुविधाही यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये लोन लेनची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही रायडर्स देखील खरेदी करु शकता.

एलआयसीने चार पर्याय सुरु केले

एलआयसीने या प्लॅनमध्ये चार पर्याय लॉन्च केले आहेत. प्लॅन A आणि B अंतर्गत, मृत्यूवर रु. 3,30,000 चे सम अ‍ॅश्युअर्ड कव्हर मिळेल. तसेच, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयांचे किमान विमा संरक्षण आणि प्लॅन डी मध्‍ये मृत्यूवर 22,00,000 रुपयांचे विमा संरक्षण कवच असेल. या योजनांसाठी कमाल प्रीमियम मर्यादा निश्चित केलेली नाही.

पात्रता जाणून घ्या

एलआयसी धन संजय योजनेची पॉलिसी घेण्यासाठी, ग्राहकाचे (Customer) किमान वय 3 वर्षे, तर पर्याय A आणि पर्याय B साठी 50 वर्षे, पर्याय C साठी 65 वर्षे आणि पर्याय D साठी कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच 3 वर्षे ते 40 वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक (Investment) करु शकतात.

योजना कुठे खरेदी करायची

तुम्हालाही LIC धन संचय पॉलिसी खरेदी करायची असेल, तर तुम्ही एजंट/इतर मध्यस्थांमार्फत ऑफलाइन आणि www.licindia.in वेबसाइटला भेट देऊन थेट ऑनलाइन खरेदी करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT