LIC IPO News Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC IPO: आता किराणा दुकानांमध्येही आयपीओ अर्जाची सुविधा उपलब्ध

डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी अनिवार्य असते.

दैनिक गोमन्तक

पेटीएम ब्रॅण्डची मालकी जिच्याकडे आहे ती भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज असे जाहीर केले की, कंपनीच्या पूर्णपणे मालकीची उपकंपनी पेटीएम मनी, एलआयसी आयपीओ, रिटेल दुकानांमध्ये घेऊन जाण्यास सज्ज आहे. (Lic Ipo News)

सामान्य माणसाला गुंतवणूक करण्याची समाज यावी यासाठी मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी कंपनीने देशभरातील किराणा दुकानांवर क्यूआर कोड्स लावले आहेत. हे क्यूआर कोड्स वापरून कोणीही सहज आपले डिमॅट खाते उघडू शकेल. डिमॅट खाते शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी अनिवार्य असते. हे खाते उघडून लोक एलआयसी आयपीओसाठी बोली लावू शकतील.

एलआयसी आयपीओ हा भारतातील सर्वांत मोठे पदार्पण करत आहे. हा ब्रॅण्ड देशात सर्वव्यापी आहे हे लक्षात घेता, पेटीएमने भागीदारी केलेल्या व्यापारी दुकानांमध्ये क्यूआर कोड्स लावले जात आहेत. यामुळे गुंतवणूकदार आयपीओसाठी सहज अर्ज करू शकतील. या उपक्रमामुळे लोकांना मोफत डिमॅट खाती उघडता येतील आणि त्याद्वारे भांडवल बाजारांतील रिटेल सहभागाच्या वाढीत योगदान दिले जाईल.

पेटीएम मनीचे प्रवक्ता म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भांडवल बाजारांमध्ये रिटेल गुंतवणूकादारांचा सहभाग वाढताना दिसत आहे आणि त्याला एलआयसी आयपीओच्या (LIC IPO) माध्यमातून आणखी वाढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अनेक नवीन गुंतवणूक आपल्या संपत्ती व्यवस्थापनाचा प्रवास सुरू करण्यास उत्सुक असतील हे गृहीत धरता, आम्ही पेटीएम व्यापारी भागीदारांच्या दुकानांमध्ये आमचे क्यूआर कोड्स लावत आहोत.

या कोड्सद्वारे लोकांना मोफत डिमॅट खाती उघडता येणार आहे. पेटीएम मनी हजारो छोट्या गुंतवणूकदारांचे सक्षमीकरण करून त्यांना त्यांचा आयपीओ प्रवास सुरळीत आणि अखंडित पद्धतीने सुरू करण्यात कशी मदत करत आहे, हे यातून दिसून येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT