Girl Dainik Gomantak
अर्थविश्व

Ladli Laxmi Yojana: लाडली लक्ष्मी योजनेत मुलींना 25 हजारांचा लाभ, सरकारची मोठी घोषणा

Ladli Laxmi Yojana Registration: मुलींना सक्षम करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी योजना सुरु केली आहे.

Manish Jadhav

Ladli Laxmi Yojana Registration: मुलींच्या सक्षमीकरणासाठी मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी योजना सुरु केली आहे. आता याच धर्तीवर इतर राज्यांची सरकारेही अशाप्रकारची योजना बनवत आहेत.

यातच शिवराज सरकारने लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी पैसे देण्याचा मूड बनवला आहे. होय, आता तुमच्या मुलीला 1 लाख 18 हजार रुपयांऐवजी 1 लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत, तर जाणून घेऊया तुम्हाला हे अतिरिक्त 25 हजार रुपये कसे मिळतील.

अशा प्रकारे तुम्हाला 25 हजार रुपये अधिक मिळतील

लाडली लक्ष्मी योजना 1 एप्रिल 2007 रोजी सुरु झाली. या योजनेंतर्गत मुलींना 1 लाख 18 हजार रुपये देण्याची तरतूद होती, मात्र आता या योजनेत आणखी 25 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने (Government) केली आहे. अशा स्थितीत आता शासनाकडून एकूण 1 लाख 43 हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

आता प्रश्न असा आहे की, हे 25 हजार रुपये कसे मिळतील, तर हे अतिरिक्त 25 हजार रुपये शेवटच्या हप्त्यानेच मिळणार आहेत. 25 हजार रुपयांची ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.

बँक खात्यात 6 हजार रुपये येतात

या योजनेंतर्गत, सरकार 5 वर्षांसाठी लाभार्थीच्या नावावर 6-6 हजार रुपये गुंतवते. अशा प्रकारे तुमच्या मुलीच्या नावावर 30 हजार रुपये जमा आहेत. काही वर्षांनी तुमच्या मुलीला हे पैसे मिळू लागतात. या योजनेतील पहिला हप्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यावर दिला जातो.

त्याचवेळी, तुमच्या मुलीच्या (Girls) खात्यावर 2 हजार रुपये पाठवले जातात. यानंतर इयत्ता 9वीमध्ये घेल्यावर 4 हजार रुपये, इयत्ता 11वीला 6 हजार रुपये आणि इयत्ता 12वीला 6 हजार रुपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT