Kisan Vikas Patra  Dainik Gomantak
अर्थविश्व

Kisan Vikas Patra योजनेत 124 महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट, घ्या जाणून

पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र प्रमाणपत्राच्या स्वरूपात बचत योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील आणि तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल, तर ही बचत योजना तुमच्यासाठीच आहे. तुम्ही देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र प्रमाणपत्राच्या स्वरूपात बचत योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. ही एक निश्चित दराची छोटी बचत योजना आहे जी एका विशिष्ट कालावधीनंतर तुमची गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी आखण्यात आली आहे. (Kisan Vikas Patra Yojana will double your money in 124 months know)

किसान विकास पत्रामध्ये (Kisan Vikas Patra) केवळ 1000 रुपयांपासून चक्रवाढ व्याज मिळायला सुरुवात होत आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना योजनेमध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो. तुम्ही योजने अंतर्गत फक्त 1000 रुपयांच्या छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाहीये. या योजनेत, प्रचलित व्याजदराने 124 महिन्यामध्ये पैसे दुप्पट होण्याची हमी असते. किसान विकास पत्र (KVP) ची सुविधा देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकणार आहे.

विकास पत्रात 6.9% व्याज

किसान विकास पत्रावर तुम्हाला 6.9% दराने व्याज मिळते. योजनेत जमा केलेले तुमचे पैसे केवळ 124 महिन्यांत दुप्पट होणार आहेत. 124 महिने म्हणजे 10 वर्षे आणि 4 महिने असल्यास तुमची मूळ रक्कम दुप्पट होणार आहे. तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. याशिवाय यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाहीये. किसान विकास पत्रामध्ये तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागणार आहेत तसेच यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाहीये.

परिपक्वता कालावधी 124 महिने

किसान विकास पत्राचा परिपक्वता कालावधी 10 वर्षे आणि 4 महिने असणार आहे. तुम्ही किसान विकास पत्र प्रमाणपत्र 1000, 5000, 10000 आणि 50000 च्या स्वरूपात खरेदी करू शकणार आहात. यामध्ये तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी काही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढू शकणार आहेत. मुदतपूर्तीनंतर तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून काढू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT