Kia India Electric Car Launch Dainik Gomantak
अर्थविश्व

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा! सिंगल चार्जमध्ये 650 किमीची रेंज; जाणून घ्या अफलातून फिचर्स अन् किंमत

Kia India Electric Car Launch: किआ इंडियाने एक शानदार इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. सिंगल चार्जवर 650 किमीची रेंज तुम्हाला कारमध्ये मिळणार आहे.

Manish Jadhav

kia india launches electric car with 650km range

किआ इंडियाने एक शानदार इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. सिंगल चार्जवर ही कार 650 किमी जाते. या शानदार इलेक्ट्रीक कारच्या फिचर्सपासून ते स्टाइलपर्यंत, सर्वकाही काही खास आहे. किआ इंडियाने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार EV6 चे हे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. नवीन डिझाइन एलिमेंट्ससह, नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. भारतात या कारची एक्स-शोरुम किंमत 65.90 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लॉन्च केली होती.

Kia EV6 फेसलिफ्टमध्ये नवीन काय आहे?

कंपनीने Kia EV6 च्या या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन एलईडी हेडलाइट्स दिले आहेत. त्यात नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत. एक्सटीरियरव्यतिरिक्त, इंटीरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आताप्रमाणे तुम्हाला या कारमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन मिळेल. याशिवाय, तुम्हाला 12 इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि डिजिटल रियर व्ह्यू मिरर देखील मिळेल. नवीन अपडेटसह Kia EV6 एकापेक्षा जास्त ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. त्याचवेळी, इंटीरियरमधून ग्लॉस ब्लॅक प्लास्टिक देखील काढून टाकण्यात आले आहे.

बॅटरी अपडेट

कंपनीने Kia EV6 ला नवीन बॅटरी अपडेटसह लॉन्च केले आहे. यामुळे एका चार्जवर कारची रेंज सुधारली आहे. Kia EV6 पूर्वी 77.4 kWh बॅटरी पॅकसह येत होती. आता कंपनीने त्यात 84 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक दिला आहे. फास्ट चार्जरवर त्याची बॅटरी फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. त्याच्या टॉप मॉडेलची रेंज 650 किमी पेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT