Jio Financial Services Limited (JFSL) Listed On The Stock Market Today:
Jio Financial Services Limited (JFSL) चा स्टॉक आज देशांतर्गत शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. तज्ञांसह सर्व गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्सची प्रतीक्षा होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे झालेल्या वित्तीय सेवा फर्म Jio Financial Services चे शेअर्स BSE सेन्सेक्सवर 265 रुपये आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 262 रुपये वर लिस्ट झाले आहेत.
मात्र शेअर बाजारात हा शेअर लिस्ट होताच यामध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाले. त्यामुळे दुपारी साडे अकरा पर्यंत शेअरची किंमत 248 पर्यंत घसरली होती.
Jio Financial Services च्या लिस्टिंग कंपनीची डिस्कव्हर्ड व्हॅल्यू 261.85 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. जिओ फायनान्शिअलकडे रिलायन्सचा ६.१ टक्के हिस्सा आहे. भारतीय मालमत्ता व्यवस्थापन उपक्रम स्थापन करण्यासाठी कंपनीने BlackRock Inc सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचनेनुसार, सोमवार, 21 ऑगस्ट 2023 पासून, Jio Financial Services Limited चे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध झाले असून आता ते एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी स्वीकारले जातील.
पहिले 10 दिवस, Jio Financial Services चे शेअर्स ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये ठेवले जातील. त्यामुळे सोमवारच्या सत्रादरम्यान जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची सूची IPO आणि इतर श्रेणीतील समभागांसाठी विशेष प्री-ओपन सत्राचा भाग असेल.
दरम्यान, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सच्या लिस्टिंगच्या तारखेच्या ग्रे मार्केटने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्सच्या किमतीच्या सुरूवातीचे संकेत दिले आहेत.
बाजार निरिक्षकांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये Jio Financial Services Limited चे शेअर्स 73 च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत.
लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच Jio Financial Services शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आणि त्यामुळे शेअरमध्ये घसरण झाली. अनेक ब्लॉक डीलमुळे NSE वर JFSL 4.6 टक्क्यांनी घसरून त्याची किंमत 250 रुपयांवर आली.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये पुढील काही काळात विक्रीचा दबाव दिसू शकतो कारण अशा भागधारकांनी ज्यांनी केवळ विशेष संधीचा फायदा घेण्यासाठी आरआयएलचे शेअर्स खरेदी केले होते ते नफा बुक करू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.