Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: ITR भरणाऱ्यांना मिळणार एवढ्या लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

Income Tax Return: आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. एक कोटीहून अधिक लोकांनी आयटीआर भरला आहे.

Manish Jadhav

Income Tax Return: आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. एक कोटीहून अधिक लोकांनी आयटीआर भरला आहे. तुम्ही 31 जुलैपर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR देखील दाखल करु शकता.

जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव ITR भरण्याची शेवटची तारीख चुकवली तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. यावेळी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की, काही लोकांना ITR भरण्यासाठी 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.

टॅक्स ब्रॅकेट 2.5 लाखांपासून सुरु होते

साधारणपणे, जुन्या कर प्रणालीनुसार, जर एखाद्याचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर नियमांनुसार कर भरावा लागेल.

म्हणजेच वर्षाला 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला आयकर भरावा लागेल. अर्थ मंत्रालयाच्या नियमांनुसार अडीच लाख ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जातो. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान ही घोषणा केली.

50 हजार रुपये अतिरिक्त सवलत

तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 80 वर्षांपेक्षा कमी असले तरीही, तुम्हाला वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सूट मिळते. या वयातील लोकांसाठी, आयकरातून सूट देण्याची मर्यादा 3 लाखांपर्यंत आहे.

म्हणजेच 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागेल. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, या वयातील लोकांना सरकारकडून (Government) 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाते.

या लोकांना 2.5 लाख अतिरिक्त सूट

काही लोकांना व्हेरी सिनियर सिटीझनच्या श्रेणीतही ठेवण्यात आले आहे. 80 वर्षांवरील लोकांचा या वर्गात समावेश आहे. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनाही कर भरण्यात अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

या वयोगटातील लोक केवळ पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावरच (Income) कराच्या कक्षेत येतात. यामुळेच या लोकांना सामान्य करदात्यांच्या तुलनेत 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.

याशिवाय, उदाहरणार्थ, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही आयकर सूट अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत दावा करत असाल, तर तुम्हाला 5 लाख रुपयांच्या उर्वरित उत्पन्नावर शून्य कर भरावा लागेल. तुमचे करपात्र उत्पन्न 2.5 लाख असले तरी त्यावर 12,500 रुपयांची सूट दिल्याने तुम्हाला शून्य कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT