अर्थविश्व

Israel-Hamas War: इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या, तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढले दर!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम आता कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसून येत आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम आता कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसून येत आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती 4.5% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. यासोबतच, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातही आव्हान निर्माण होऊ शकते.

भारत आणि इस्रायलमधील व्यापार किती आहे?

हमासच्या (Hamas) हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, इस्रायलचा भारतासोबतचा व्यापार 10 अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, इस्रायलची निर्यात $8.5 अब्ज आणि आयात $2.3 अब्ज आहे.

कच्च्या तेलाची किंमत किती आहे?

सध्या हे युद्ध पश्चिम आशियातील अनेक भागात पसरले आहे. यासोबतच इतर अनेक देशांचाही त्यात समावेश होऊ शकतो.

सध्या कच्च्या तेलाची किंमत 4.08 टक्क्यांच्या वाढीसह 86.17 डॉलर प्रति बॅरल आहे. त्याचवेळी, ब्रेंट क्रूडची किंमत 3.80 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल $ 87.79 वर आहे.

700 हून अधिक इस्रायली सैनिक मारले गेले

हमासच्या हल्ल्याला 40 तासांहून अधिक काळ उलटूनही इस्रायली सैन्य अजूनही अनेक ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांशी लढत आहे. इस्रायलमध्ये (Israel) किमान 700 लोक मारले गेल्याची नोंद आहे आणि गाझामध्ये 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. गेल्या अनेक दशकांत इस्रायलमध्ये इतक्या लोकांचा मृत्यू झालेला नाही.

1000 हमास सैनिकांनी भाग घेतला

इस्रायली लष्कराचा अंदाज आहे की, शनिवारच्या हल्ल्यात 1,000 हमास सैनिकांनी भाग घेतला होता. गाझावर सत्ता गाजवणाऱ्या दहशतवादी गटाने कट किती मोठ्याप्रमाणात कट रचला असेल हे यावरुन दिसून येते. इस्रायलच्या ताब्यामुळे आणि गाझा नाकेबंदीमुळे पॅलेस्टिनींच्या वाढत्या त्रासाला उत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे हमासने म्हटले आहे.

यूएनने ही माहिती दिली

संयुक्त राष्ट्राने सांगितले की, रविवारी रात्री उशिरापर्यंत इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील 159 घरे उद्ध्वस्त झाली आणि 1,210 इतर घरांचे नुकसान झाले. गाझामधील विस्थापितांची संख्या 1,23,000 हून अधिक झाली आहे.

पॅलेस्टाईन शरणार्थींसाठी असलेल्या यूएनच्या एजन्सीने सांगितले की, ज्या शाळेमध्ये 225 हून अधिक लोक आश्रय घेत होते, त्यांना थेट लक्ष्य करण्यात आले.

अनेक इस्रायली मीडिया संस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, इस्रायलमध्ये 44 सैनिकांसह किमान 700 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 78 मुले आणि 41 महिलांसह 413 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही बाजूचे सुमारे दोन हजार लोक जखमी झाले आहेत.

एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी 400 दहशतवाद्यांना ठार केले आहे आणि अनेकांना ओलीस ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

SCROLL FOR NEXT