IRCTC's special train fares increased Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTC च्या स्पेशल ट्रेनचे भाडे वाढले; धार्मिक यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना धक्का

भारत दर्शन यात्रा टूर पॅकेजचे नाव बदलून स्वदेश दर्शन असे करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मार्फत देशातील धार्मिक स्थळांना परवडणाऱ्या दरात भेट देणे आता शक्य नाही. या आर्थिक वर्षापासून IRCTC स्पेशल ट्रेनचे भाडे वाढले आहे. (IRCTC's special train fares increased)

IRCTC ने या महिन्यात 28 एप्रिल रोजी प्रयागराज संगम रेल्वे स्थानकावरून दक्षिण भारतात (South India) जाणाऱ्या विशेष ट्रेनचे भाडे 12,185 रुपयांवरून 20,440 रुपये केले आहे. IRCTCचे म्हणणे आहे की त्यांचा रेल्वेशी (Railway) झालेला करार आता संपला आहे. त्यामुळे प्रवाशांना मिळणारे अनुदान आता बंद करण्यात आले आहे.

रेल्वेने प्रवाशांना दिले जाणारे अनुदान बंद केल्यानंतर भारत दर्शन यात्रा टूर पॅकेजचे नावही बदलून स्वदेश दर्शन असे करण्यात आले आहे. IRCTC च्या माध्यमातून देशातील धार्मिक स्थळांची यात्रा परवडणाऱ्या दरात केली जाते.

नवीन आर्थिक वर्षापासून, भारत दर्शन यात्रेअंतर्गत IRCTCचा रेल्वेसोबतचा करार संपला आहे. हा करार केवळ मार्च-2022 पर्यंत होता. नवीन सेवा शर्तींनुसार, प्रति व्यक्ती टूर पॅकेजचे दर पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहेत. IRCTCच्या या निर्णयामुळे धार्मिक यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांनाही धक्का बसला आहे. आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर IRCTC गाड्यांच्या पार्किंगसाठी शुल्क आकारत नव्हती. मात्र आता प्रत्येक तासाचे शुल्क भरावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT