Women's Day Special: Dainik Gomantak
अर्थविश्व

Women's Day Special: गुंतवणुकीच्या बाबतीत 'या' क्षेत्रात महिला अव्वल, वाचा सविस्तर

सध्याच्या युगातील महिला या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन आर्थिक सक्षम बनत आहे.

दैनिक गोमन्तक

Women's Day Special 2023: आजच्या महिला आर्थिक बाजुने सक्षम होण्यासाठी अनेक योजनांममध्ये गुंतवणुक करतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षात गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण 68 टक्के तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण 8 टक्के आहे.   

आजही या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. टीबीएनजी कॅपिटल अॅडव्हायजर्सचे सीईओ तरुण बिरानी यांच्या मते महिला प्राॅपर्टी खरेदी करण्यात उत्सुक असतात. त्यासाठी रिअल इस्टेट गुंतवणूक ही सिक्यूरिटी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.

आर्थिक साक्षर असलेल्या महिलांना (Women) शिक्षण , व्यवसाय, गुंतवणूक आदींसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नसते. पण महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो, त्यामुळे महिलांचा कल पैसे साठवण्याकडे अधिक असतो. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करुन महिलांना नेमका काय आणि कसा फायदा होतो ते जाणून घेऊया -

  • लोअर स्टॅम्प ड्यूटी

रिअल इस्टेटमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना स्टॅम्प ड्यूटी कमी भरावी लागते, महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांना 1 टक्का कमी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते.

  • महिलांना होमलोन स्वस्त

कर्ज फेडीसंदर्भात महिला या पुरुषांच्या तुलनेत लवकर फेडतात, असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच बँका (Bank) महिलांना स्वस्त होमलोन देऊ करतात. त्याचप्रमाणे होमलोनची प्रोसेसही सरळ सोपी आहे.

  • कर

रिअल इस्टेटमध्ये कऱण्यात आलेल्या गुंतवणूकीत (Investment) अनेक फायदे आहेत. घर बांधण्यासाठी जर तुम्ही गृहकर्ज घेतले तर आयकर कलम 80 सीसी अंतर्गत 1.5 लाखांची सूट मिळते. त्याशिवाय सेक्शन 24 अंतर्गत इंटरेस्ट पेमेंटवर 2 लाख रुपयांची अतिरिक्त सूट क्लेम करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT