PM Kisan Maandhan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Mandhan Scheme: वयोवृद्ध शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ

किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी देखील पीएम मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

PM Mandhan Scheme: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. याच प्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पीएम मानधन योजना राबवली जात आहे. किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी देखील पीएम मानधन योजनेचा (PM Mandhan Yojana) लाभ घेऊ शकतात.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना घेऊन येत असते. पीएम मानधन योजना यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत देशातील वृद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या अंतर्गत वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते. योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केल्यावर, तुमची पीएम किसान मानधन योजनेतही नोंदणी केली जाते.

पीएम किसान मानधन योजना काय आहे?

देशातील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत, 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. त्यानुसार वृद्ध शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ 18 वर्षांवरील तरुणांपासून 40 वर्षांवरील शेतकऱ्यांना घेता येईल. पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला या योजनेत पैसे जमा करावे लागतात.

प्रीमियम किती भरावा लागेल?

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून प्रीमियम भरावा लागतो. त्याच्या प्रीमियमची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे. वयाच्या 60 व्या वर्षांनंतर, प्रीमियमचे पैसे कापून घेणे बंद होते आणि शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू लागते.

नोंदणी कशी करावी?

किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करू शकता. तुम्हाला ऑफलाइन नोंदणी करायची असेल, तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या. तेथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी maandhan.in या संकेतस्थळावर वर जा आणि स्व-नोंदणी करा. येथे तुमच्याकडून मोबाईल नंबर, ओटीपी इत्यादींची माहिती घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT