Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani Donation: मुकेश अंबानींनी व्यंकटेश्वर मंदिराला दिले दान, जाणून घ्या

Donation In Venkateshwara Temple: मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराला दीड कोटी रुपयांची देणगी दिली.

दैनिक गोमन्तक

Venkateshwar Temple: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराला दीड कोटींची देणगी दिली. मंदिराच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'भगवान व्यंकटेश्वरावर भक्ती असलेले अंबानी शुक्रवारी पहाटे मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत एनकोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आणि आरआयएलचे इतर अधिकारीही होते.'

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'अंबानींनी प्रार्थना केल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानचे (TTD) अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए.के. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे दीड कोटींचा धनादेश सुपूर्द केला.'

दुसरीकडे, तिरुमला येथील एका टेकडीवरील अतिथीगृहात काही वेळ घालवल्यानंतर अंबानी, राधिका मर्चंट आणि इतरांनी पुरोहितांच्या वैदिक मंत्रोच्चारात गर्भगृहात सूर्योदयाच्या वेळी केलेल्या अभिषेकममध्ये भाग घेतला, जो सुमारे एक तास चालला.

चारधाम बोर्डालाही 5 कोटींची देणगी देण्यात आली

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दान करण्यात नेहमीच पुढे असतात. अलीकडेच, त्यांनी उत्तराखंडच्या (Uttarakhand) चारधाम बोर्डाला 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती. ही देणगी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी दिली.

दान का दिले

वास्तविक, कोरोना काळात मंदिर बंद असल्याने व्यवस्थापन आणि पूजा ठप्प झाली होती. त्यामुळे चारधाम मंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. मंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले होते. अंबानींकडून मिळणारा पैसा धार्मिक स्थळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी वापरला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT