Cooking Oil  Dainik Gomantak
अर्थविश्व

लवकरच खाद्यतेल महागणार! इंडोनेशियाने तेलाच्या निर्यातीवर घातली बंदी

इंडोनेशियाचा हा निर्णय भारतासाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात खाद्यतेलाचे (Edible oil price) दर आणखी महागण्याची शक्यता आहे . जगातील सर्वोच्च पाम तेल उत्पादक इंडोनेशियाने देशांतर्गत टंचाई कमी करण्यासाठी आणि गगनाला भिडलेल्या तेलाच्या किमती रोखण्यासाठी खाद्यतेल आणि त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याचा (Indonesia bans palm oil exports ) निर्णय घेतला आहे . इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे आगामी काळात अन्नधान्य (Food inflation) महागाई आणखी वाढू शकते.

इंडोनेशियाचा हा निर्णय भारतासाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महागाई सातत्याने 6 टक्क्यांच्या वर आहे. मार्चमध्ये किरकोळ महागाईने 17 महिन्यांचा उच्चांक गाठला होता. मार्चच्या विक्रमी महागाईत अन्नधान्य महागाईचा मोठा वाटा आहे .

खाद्यान्न महागाई विभागात, तेल महागाई मार्चमध्ये 18.79 टक्‍क्‍यांनी वाढली आहे, जी फेब्रुवारीत 16.4 टक्‍क्‍यांवर होती. अन्नधान्य महागाई हा रिझर्व्ह बँकेसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी शुक्रवारी खाद्यतेल आणि कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. याच्या एक दिवस आधी शेकडो लोकांनी खाद्यपदार्थांच्या महागाईविरोधात राजधानीत निदर्शने केली होती.

28 एप्रिलपासून तेल निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे

इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून पाम तेल आणि कच्च्या मालाच्या निर्यातीवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विडोडो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "देशातील खाद्यतेलाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आणि किफायतशीर दरात राखली जावी यासाठी मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे परीक्षण आणि मूल्यमापन करत राहीन."

भारत सर्वात मोठा ग्राहक

भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. जगातील बहुतेक पाम तेल अन्न तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे इंडोनेशियन सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे गंभीर परिणाम भारतावर होऊ शकतात. पामतेलाच्या किमती आधीच विक्रमी पातळीवर आहेत. जगभरात त्याची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया हे पाम तेलाचे दोन प्रमुख उत्पादक आहेत. जानेवारीमध्येही इंडोनेशियाने पामतेल निर्यात बंद केली होती, ती मार्चमध्ये काढून टाकण्यात आली होती.

सूर्यफूल तेलाची तीव्र कमतरता

युक्रेन संकटामुळे जगात सूर्यफूल तेलाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जगात निर्यात होणाऱ्या सूर्यफूल तेलापैकी 76 टक्के तेल काळ्या समुद्रातून जाते. रशियाने येथे अडथळा निर्माण केला आहे. फेब्रुवारीपासून रशियन सैन्य युक्रेनमध्ये आहे, त्यामुळे हालचालींवर वाईट परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT