अर्थविश्व

Indian Tea Return: गव्हा नंतर या देशाने भारताचा चहाही केला परत

भारतीय चहामध्ये कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील चहा उत्पादकांसाठी एक वाईट बातमी आहे. भारतीय चहामध्ये कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातून चहाची खेप भारतात परत आली आहे. इंडियन टी एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (ITEA) अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी ही माहिती दिली आहे. (Indian Tea Return)

श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे भारतीय चहा उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी होती, परंतु मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशके आणि रसायनांच्या वापरामुळे मोठा फटका बसला आहे.

चहा बोर्ड निर्यातीला गती देण्याचा विचार करत आहे. परंतु माल परत आल्याने माल पाठवण्यामध्ये सातत्याने घट होत आहे. देशात विकल्या जाणार्‍या सर्व चहाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे पालन केले पाहिजे. मात्र, कनोरिया यांनी पीटीआयला सांगितले की, बहुतेक खरेदीदार तोच चहा विकत घेत आहेत, ज्यामध्ये रसायनांचे प्रमाण जास्त आहे.

EU नियम कडक

2021 मध्ये भारताने 195.90 दशलक्ष किलो चहाची निर्यात केली. भारतीय चहाचे प्रमुख खरेदीदार कॉमनवेल्थ इंडिपेंडेंट स्टेट्स (CIS)आणि इराण होते. बोर्डाने यावर्षी 300 दशलक्ष किलो चहाच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. कनोरिया म्हणाले की, अनेक देश चहासाठी प्रवेश नियमांचे कठोर पालन करत आहेत. बहुतेक देश युरोपियन युनियन (EU) मानकांचे पालन करतात, जे FSSAI नियमांपेक्षा अधिक कठोर आहेत.

नियम शिथिल करण्याची मागणी

कायद्याचे पालन करण्याऐवजी अनेक लोक सरकारकडून FSSAI निकष आणखी शिथिल करण्याची मागणी करत आहेत, असे कनोरिया म्हणाले. चहा हे आरोग्य पेय मानले जात असल्याने हे चुकीचे संकेत देईल. चहा बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, या मुद्द्यावर चहा पॅकर्स आणि निर्यातदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. भारताने 2021 मध्ये 5,246.89 कोटी रुपयांचा चहा निर्यात केला अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलामुळे चहाच्या बागांमध्ये बरेच बदल झाले आहेत. अतिवृष्टी किंवा प्रदीर्घ दुष्काळामुळे कीटकांचा धोका वाढला आहे. अहवालानुसार, कीटकनाशकाचा वापर संपल्यानंतरच पाने तोडली जातात. याचे कारण चहाच्या पानांवर कीटकनाशकाचे अंश राहतात. कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः १० ते २० दिवसांनी पाने तोडली जातात. या नियमांचे पालन केले नाही, तर त्यामध्ये अधिक कीटकनाशके असण्याची शक्यता असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT