Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी!

IRCTC: भारतीय रेल्वेची ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 75 शहरे वंदे भारत सेमी-हाय स्पीड ट्रेनने जोडण्याची योजना आहे.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express: भारतीय रेल्वेची ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 75 शहरे वंदे भारत सेमी-हाय स्पीड ट्रेनने जोडण्याची योजना आहे. सध्या देशातील पाच वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. या गाड्या सुरु झाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. आता कमी वेळात जास्त अंतर कापता येते. आगामी काळात इंटरसिटी आणि शताब्दी एक्स्प्रेसची जागा वंदे भारत गाड्या घेतली, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज नाही

येत्या काळात वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train) वेग आणखी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय तंत्रज्ञानात बदल करण्याचा विचार करत आहे. यामुळे वळणावर ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज भासणार नाही. रेल्वे मंत्रालयाकडून येणाऱ्या गाड्यांपैकी एक चतुर्थांश गाड्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे रेल्वेला लांबचे अंतर कापण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

ट्रेनचा सरासरी वेग कमी होतो

आता वक्र ट्रॅकवर ट्रेनचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे ट्रेनचा सरासरी वेग कमी होऊन ट्रेनला जास्त वेळ लागतो. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ट्रेनला वक्र ट्रॅकवरुन वेगाने जाणे शक्य होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन (Train) सध्याच्या ट्रॅकवरच 'टिल्ट टेक्नॉलॉजी'ने चालवण्याची तयारी सुरु आहे.

तसेच, आगामी काळात देशभरात 400 वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. या 400 गाड्यांपैकी 100 लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 'टिल्ट टेक्नॉलॉजी' वापरण्यात येणार आहे. सध्या इटली, रशिया (Russia), स्वित्झर्लंड, चीन, जर्मनी इत्यादी देशांमध्ये या तंत्रज्ञानावर ट्रेन धावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT