Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: रेल्वेचे बल्ले-बल्ले, पॅसेंजर्स नव्हे तर येथून झाली रेकॉर्डब्रेक कमाई!

Indian Railway: वाहनांची वाहतूक करुन रेल्वे विक्रमी कमाई करत आहे. भारतीय रेल्वेने गेल्या एका वर्षात ऑटोमोबाईल वाहतूक 60 टक्क्यांनी वाढवली आहे.

Manish Jadhav

Indian Railway: वाहनांची वाहतूक करुन रेल्वे विक्रमी कमाई करत आहे. भारतीय रेल्वेने गेल्या एका वर्षात ऑटोमोबाईल वाहतूक 60 टक्क्यांनी वाढवली आहे.

वाहतुकीचे सुरक्षित आणि किफायतशीर साधन रेल्वे बनले आहे. विशेष म्हणजे, कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची संधी देखील मिळते.

भारतीय रेल्वेने (Indian Railway) अलीकडच्या काळात ऑटोमोबाईल वाहतुकीत लक्षणीय वाढ पाहिली आहे. ऑटोमोबाईल वाहतुकीतील ही वाढ खाजगी मालकीसह विशेष वॅगनची उपलब्धता यासारख्या अनेक उपाययोजनांचा परिणाम आहे.

दरम्यान, सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) सह ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित भागधारकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आधारित, व्हेईकल फेअर ट्रेन ऑपरेटर (AFTO) धोरण वेळोवेळी उदार केले गेले आहे.

यामुळे ऑटोमोबाईल उत्पादकांना त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट वॅगनची मालकी मिळू शकते. यासोबतच, सध्याच्या BCACBM वॅगन्स व्यतिरिक्त, SUV कारच्या वाहतुकीसाठी RDSO मध्ये नवीन डिझाइन ऑटो-कॅरिअर वॅगन्स देखील तयार करण्यात आल्या आहेत.

तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 28 फेब्रुवारी या कालावधीत 5,015 रेक लोड करुन भारतीय रेल्वेने ऑटोमोबाईल वाहतूक वाढवत 69 टक्के वाढ साधली आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 2966 रेक लोड करण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 5015 रेक लोड करण्यात आले आहेत.

यापूर्वी, 2021-22 या आर्थिक वर्षातही, भारतीय रेल्वेने गेल्या आठ वर्षांत लहान प्रवासी (Passengers) गाड्यांच्या देशांतर्गत वाहतुकीत 10 पटीने वाढ करुन ऑटोमोबाईल वाहतुकीत वाढ नोंदवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT