Ganpati Mahotsav Special Train| Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: गणपती उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी विशेष 214 रेल्वे गाड्यांची सोय

Ganpati Mahotsav Special Train: प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

गणपती महोत्सव (Ganpati Mahotsav) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या घरी जातात. यावेळी लोकांच्या सोयीसाठी रेल्वेने गणपती उत्सव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सुविधेची पूर्ण काळजी घेतात. गणपती उत्सव, होळी , दिवाळी, दुर्गापूजा इत्यादी मोठ्या सणांना विशेष गाड्या चालवल्या जातात. (Ganpati Mahotsav Special Train 2022 News)

प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त (Ganpati Mahotsav) विशेष 214 रेल्वे गाड्या धावणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या धावणार आहेत.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट करत लोकांना कळवले आहे की, गणपती उत्सवाच्या विशेष प्रसंगी रेल्वे लोकांच्या सोयी लक्षात घेऊन विशेष ट्रेन चालवण्याचे नियोजन केले आहे. या विशेष प्रसंगी रेल्वेकडून एकूण 214 गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. सणानिमित्त लोकांना सहज आपल्या घरी जाता येणार आहे.

* वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

रेल्वेने 214 गणपती महोत्सवानिमीत्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. लवकरच रेल्वे या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर होणार आणि त्यानंतर या गाड्यांचे रिजर्वेशन सुरू होईल. या गाड्या जुलै अखेर ते ऑगस्टपर्यंत चालतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT