Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय, 'या' रेल्वे कंपनीतील विकणार हिस्सेदारी!

Indian Railway News: रेल्वेबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमधील आपली हिस्सेदारी विकू शकते.

Manish Jadhav

Indian Railway News: रेल्वेबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमधील आपली हिस्सेदारी विकू शकते.

पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार सध्या भागविक्रीबाबात धांडोळा घेत आहे. IRFC ही भारतीय रेल्वेची सपोर्टेड फंडिग ब्रांच आहे, जी रोलिंग स्टॉक/प्रोजेक्ट एसेट्सच्या संपादनासाठी वित्त बाजारातून निधी उभारते.

सरकारचा हिस्सा 86 टक्के आहे

दरम्यान, या सर्व मालमत्ता भारतीय रेल्वेला भाडेतत्त्वावर देण्याचे काम केले जाते. सद्यस्थितीत फंडिंग आर्ममध्ये सरकारची हिस्सेदारी 86 टक्क्यांच्या जवळपास आहे. रॉयटर्सचा हवाला देत एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेक विक्री लवकरच होईल.

भागभांडवल टप्प्याटप्प्याने विकले जाईल

अधिकाऱ्याने पीटीआयच्या हवाल्याने सांगितले की, सरकारने अद्याप किती भागभांडवल विकायचे हे ठरवले नसले तरी आतापर्यंतच्या योजनेनुसार, सरकार (Government) अनेक टप्प्यांत 11 टक्क्यांपर्यंत हिस्सा विकू शकते.

शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला

आज बाजार उघडल्यापासून IRFC च्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. कंपनीच्या समभागांनी आज बीएसईवर सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह 52.71 रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. याव्यतिरिक्त, एकत्रित 121 दशलक्ष इक्विटी शेअर्स, जे IRFC च्या एकूण इक्विटीच्या सुमारे 0.93 टक्के आहेत.

एका महिन्यात स्टॉक 57 टक्क्यांहून अधिक वाढला

गेल्या एका महिन्याचा चार्ट पाहिला तर कंपनीच्या शेअर्समध्ये 30 दिवसांत 57.38 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 17 जुलै रोजी कंपनीच्या शेअरची (Share) किंमत 32 रुपयांच्या पातळीवर होती आणि आज हा शेअर 51 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले

गेल्या आठवड्यात, कंपनीने पहिल्या तिमाहीचे (Q1FY24) निकाल जाहीर केले. या कालावधीत, कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.3 टक्क्यांनी वर्ष-दर-वर्ष घट होऊन 1,556.6 कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,661.6 कोटी रुपयांचा नफा झाला होता. FY23 च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा रु. 1,327.7 कोटींवरुन 17.2 टक्क्यांनी वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT