India Unemployment Rate July September 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

Job Market Good News: देशाच्या जॉब मार्केटमधून आनंदाची बातमी! बेरोजगारी दर घसरुन 5.1 टक्क्यांवर पोहोचला; रोजगाराच्या संधींमध्ये वाढ

India Unemployment Rate July September 2026: 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमधील बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर 2026च्या तिमाहीत घसरुन 5.1 टक्क्यांवर आला.

Manish Jadhav

India Unemployment Rate July September 2026: देशातील रोजगाराबाबत अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आवधिक श्रम बल सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार, 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमधील बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर 2026च्या तिमाहीत घसरुन 5.1 टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 5.2 टक्के होता, तर चालू वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत तो 5.4 टक्के नोंदवला गेला होता. सुमारे 5.55 लाख लोकांच्या सर्वेक्षणावर आधारित असलेल्या या अहवालावरुन देशात रोजगाराच्या संधींमध्ये सातत्याने सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात झालेली मोठी घट होय. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर आधीच्या तिमाहीतील 4.8 टक्क्यांवरुन कमी होऊन चालू तिमाहीत 4.3 टक्क्यांवर आला. ग्रामीण पुरुषांमधील बेरोजगारीचा दरही गेल्या वर्षीच्या 4.7 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. तर शहरी भागातील एकूण बेरोजगारीचा दर 6.8 टक्के राहून जवळपास स्थिर नोंदवला गेला. शहरांमध्ये पुरुषांमधील बेरोजगारी दर 6.1 टक्के आणि महिलांमधील बेरोजगारी दर 8.8 टक्क्यांपर्यंत घसरुन किरकोळ दिलासा मिळाला.

रोजगाराच्या (Employment) स्वरुपात झालेल्या सकारात्मक बदलांमुळे नागरिकांचा भर आता स्वतःच्या व्यवसायाकडे आणि कायमस्वरुपी नोकऱ्यांकडे वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांचे प्रमाण 61.4 टक्क्यांवरुन वाढून 62.7 टक्क्यांवर पोहोचले, तर शहरांमध्ये नियमित पगारदार कर्मचाऱ्यांची संख्या 49.3 टक्क्यांवरुन वाढून 49.6 टक्के झाली. सर्वात समाधानाची बाब म्हणजे शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांत दैनंदिन मजुरी करणाऱ्यांची संख्या घटली. नागरिक आता रोजगाराच्या दृष्टीने अधिक स्थैर्याकडे वाटचाल करत असून ही अर्थव्यवस्था बळकट होण्याची स्पष्ट लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज; शिवसेनेची पत्रकबाजी!

Private Bus Hits Scooter: डिचोलीत खासगी प्रवासी बसची स्कूटरला धडक, एक महिला गंभीर; दुसरी थोडक्यात बचावली

4 वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! म्हापशातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, 83 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दीड वर्षापासून खातोय धूळ

Weather Update: पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचा चटका! हिवाळा सुरू, पण उन्हाचा तडाखा कायम, राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ

IPL Trade Deal: अखेर सस्पेन्स संपला! हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंहच्या ट्रेडवर BCCI चा शिक्कामोर्तब; सॅलरीत कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT