wheat  Danik Gomantak
अर्थविश्व

सरकारचा मोठा निर्णय! गव्हाच्या निर्यातीवर भारताकडून तत्काळ बंदी

wheat ban | गहू निर्यातीसंदर्भात भारत सरकारने भक्कम पावले उचलली

दैनिक गोमन्तक

वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. मागील काही काळापासून रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारत निर्यातीच्या वाढत्या संधींकडे पहात होता. मोठ्या प्रमाणावर गहू आयात करणाऱ्या 9 देशांत व्यापारी प्रतिनिधीमंडळे पाठवून निर्यात वाढविण्याचे धोरण केंद्राने ठरविले होते. मात्र याच युद्धाचा परिणाम देशातील महागाईवर होत आहे. त्यावर उपाय म्हणून आता गहू निर्यातीसंदर्भात केंद्राने भक्कम पावले उचलली आहेत. यंदा उष्णतेच्या लाटेमुळे देशांतर्गत अपेक्षित गहू उत्पादनावरच संकट आल्याने भारताने गहू निर्यातीवर बंदी घातली आहे. (India bans wheat exports)

या अधिसूचनेपूर्वी निर्यातीसाठी अपरिवर्तनीय पत्रे (LOC) जारी केली गेली असून त्यांना परवानगी दिली जाईल, असे परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 13 मे रोजीच्या अधिसूचनेत म्हटले आहे. निर्यात गव्हाचे धोरण तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित आहे असे DGFT ने सांगितले.

भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि त्यांच्या सरकारांच्या विनंतीनुसारच आता भारतातून गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे . तर दुसरीकडे DGFT ने कांदा बियाण्यांसाठी निर्यात अटी शिथिल करण्याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

मोदी सरकारसमोर 'संकटांची मालिका'; युद्ध, महागाई आणि विद्यार्थी आंदोलनांचे गडद ढग!

Goa Weather Update: पावसाची दडी अन् उन्हाचा चटका; बळीराजाच्या चिंतेत दिवसागणिक भर!

Mayde Village: मयडेला शहर घोषित करण्यास विरोध, ग्रामसभेने प्रस्ताव फेटाळला; ग्रामीण अस्तित्व कायम ठेवण्याचा ठराव

...अन् आईने फोडला हंबरडा! अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी; तिघा मदार बंधूंवर शोकाकुल स्थितीत अंत्यविधी

SCROLL FOR NEXT