Anthony Albanese & Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Trade Agreement: वा मोदीजी वा! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मुक्त व्यापार करार

Free Trade Agreement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा (FTA) दोन्ही देशातील सरकार आणि जनतेला फायदा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Free Trade Agreement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा (FTA) दोन्ही देशातील सरकार आणि जनतेला फायदा होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) 29 डिसेंबरपासून लागू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'हे एक पाऊल आहे, जे पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार $ 45-50 अब्ज होईल.'

बाजारपेठेत प्रवेशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील

डॉन फॅरेल यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, '(अ‍ॅन्थनी) अल्बानीज सरकारने ऑस्ट्रेलिया-भारत (India) आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) लागू करण्यासाठी भारत सरकारने आपल्या देशांतर्गत आवश्यकता पूर्ण केल्याच्या पुष्टीकरणाचे स्वागत केले.' ते पुढे म्हणाले की, 'या व्यापार करारामुळे 29 डिसेंबर 2022 पासून ऑस्ट्रेलियन कंपन्या आणि ग्राहकांना (Customers) बाजारपेठेत प्रवेशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.'

भारतीय निर्यातदारांना फायदा होईल

या करारावर या वर्षी 2 एप्रिल रोजी स्वाक्षरी करण्यात आली. करारानुसार, कापड, चामडे, फर्निचर, दागिने आणि यंत्रसामग्रीसह विविध क्षेत्रातील 6,000 हून अधिक भारतीय निर्यातदारांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. याशिवाय, या करारामुळे कापड आणि पोशाख, काही कृषी आणि मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडासाहित्य, दागिने, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रिकल वस्तू यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांना फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT