Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Slab मध्ये मोदी सरकार करतेय बदल, 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त!

Income Tax Slab: आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही आयकर भरुन त्रस्त असाल तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही.

दैनिक गोमन्तक

Income Tax Slab: आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही आयकर भरुन त्रस्त असाल तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. यावेळी केंद्र सरकार करात मोठा बदल करण्याचा विचार करत असून, त्यानंतर 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट देणार आहेत.

आता मर्यादा अडीच लाख रुपये आहे

सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही, सरकार (Government) ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. म्हणजेच, तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

शेवटचा बदल 2014 मध्ये झाला होता

केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल, जो अर्थमंत्री सादर करतील. यानंतर 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या वर्षी सरकार मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देऊ शकते, असे मानले जात आहे. याआधी पर्सनल टॅक्स सवलतीच्या मर्यादेत शेवटचा बदल 2014 साली करण्यात आला होता.

अरुण जेटली यांनी मर्यादा वाढवली होती

यापूर्वी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मर्यादा 2 लाखांवरुन अडीच लाख रुपये करण्याची घोषणा केली होती, मात्र यावेळी ही मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

2 वर्षे जुनी कर प्रणाली बदलणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 2 वर्षे जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी (Investment) अधिक पैसे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT