ITR Filing Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: ITR फाइलर्ससाठी मोठी अपडेट, 'हा' आकडा जाणून व्हाल चकित!

ITR Filing: जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल, तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित अपडेट माहित असणे आवश्यक आहे.

Manish Jadhav

ITR Filing: जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल, तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित अपडेट माहित असणे आवश्यक आहे. यावेळी आयटीआर फाइल करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र यापैकी किती लोकांनी आयटीआर भरला आहे.

हा आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावेळी 31 जुलैपर्यंत 6.77 कोटी लोकांच्या वतीने आयटीआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी आयटीआर फाइल करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.

4.65 कोटी लोकांनी शून्य कर भरला

दरम्यान, 6.77 कोटी ITR पैकी किती लोकांनी शून्य कर भरला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला या आकृतीबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल.

शून्य आयकर म्हणजे अशा लोकांचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, यावेळी 4.65 कोटी लोकांनी शून्य कर म्हणजेच शून्य ITR भरला आहे.

ई-व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवसांचा कालावधी

यावेळी, देशात सर्वाधिक आयटीआर फाइल्सचा विक्रम झाला आहे. आयकर विभागाने सांगितले की, 4.65 कोटी लोकांच्या आयकर रिटर्ननुसार त्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे.

31 जुलैनंतर आयटीआर फाइल करणाऱ्यांना ई-व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवसांचा वेळ मिळाला आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव ITR दाखल करु शकत नसाल तर तुम्ही 5000 रुपयांपर्यंतचा दंड भरुन आयकर रिटर्न भरु शकता.

आयकर संकलनावर सरकारचा भर

दुसरीकडे, इन्कम टॅक्स कलेक्शन वाढवण्यावर सरकार (Government) सातत्याने भर देत आहे. टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही वाढली, मात्र यावेळी 4.65 कोटी लोकांनी शून्य कर भरला आहे. या आकडेवारीनुसार कर भरणाऱ्यांची एकूण संख्या निम्म्याहून कमी आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात शून्य कर भरणाऱ्यांची संख्या 2.9 कोटी होती.

यानंतर आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पण शून्य कर भरणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. आयकर रिटर्नच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, देशात एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न दाखवणाऱ्या करदात्यांची संख्या 1.69 लाख आहे. याशिवाय 5 ते 10 लाख रुपये कमावणारे करदाते 1.10 कोटी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT