Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR Filing: मोदी सरकारकडून दिलासा, Income Tax वर मिळाली मोठी सूट; यापूर्वी कधीही...

Income Tax Return: देशात मोदी सरकार आल्यानंतर अनेक बदल झाले आहेत. या बदलांमुळे देशातील लोकांनाही अनेक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

Manish Jadhav

Income Tax Return: देशात मोदी सरकार आल्यानंतर अनेक बदल झाले आहेत. या बदलांमुळे देशातील लोकांनाही अनेक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी, देशातील लोकांसाठी आयकर विवरणपत्र भरणे देखील खूप महत्वाचे आहे.

ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांच्यासाठी आयटीआर भरणे खूप महत्वाचे आहे. मोदी सरकारने आयकर रिटर्नमध्येही बरीच सूट दिली आहे, ज्याद्वारे लोकांना कर वाचवण्यासही मदत होणार आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...

करमुक्त उत्पन्न

दरम्यान, 2023 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी घोषणा केली की नवीन प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. तथापि, 7 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांचे काय होईल, अशी चिंता व्यक्त केली जात होती.

याबाबत सीतारामन म्हणाल्या की, सरकारने अशा चिंतेची दखल घेतली आहे. आता नवीन कर प्रणाली अंतर्गत किरकोळ सवलतीच्या तरतुदी लागू केल्यामुळे 7.27 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले आहे.

स्टॅंडर्ड डिडक्शन

"नव्या व्यवस्थेतर्गंत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, जो किरकोळ सवलतीच्या तरतुदींसह प्रभावीपणे 7.27 लाख रुपयांपर्यंत वाढतो," असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय, नवीन प्रणालीला आकर्षक बनवण्यासाठी 2023 च्या अर्थसंकल्पात (Budget) 50,000 रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन जाहीर करण्यात आले होते.

सूट

सीतारामन पुढे म्हणाल्या की, आता नवीन आयकर प्रणाली अंतर्गत 50,000 रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन जाहीर करण्यात आले. पगारदार कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन सुविधा उपलब्ध आहे.

याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय खर्चावरील सवलत मर्यादा 30,000 रुपयांवरुन 50,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच जीवरक्षक औषधे आणि कर्करोगाच्या औषधांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT