Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: मोठी बातमी, आता उत्पन्नावर भरावा लागणार 5 टक्के कर; अर्थमंत्र्यांचा आदेश!

दैनिक गोमन्तक

Income Tax Slab: नवीन वर्षात करोडो करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हीही इन्कम टॅक्स भरलात तर आतापासून तुम्हाला फक्त 5% टॅक्स भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. देशभरात अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरु आहे, अशा परिस्थितीत मध्यमवर्गीयांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच यावेळी करसवलतीची मोठी अपेक्षा आहे.

कोणतीही प्रणाली वापरा

माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, आतापासून अनेकांना फक्त 5% कर भरावा लागेल. तुम्ही नवीन करप्रणाली स्वीकारा किंवा जुनी करप्रणाली, पण आता तुम्हाला जास्त कर भरावा लागणार नाही.

ज्यांना 5% कर भरावा लागेल

तसेच, 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना फक्त 5 टक्के दराने कर भरावा लागेल. या लोकांना यापेक्षा जास्त कर भरावा लागणार नाही. दुसरीकडे, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

करमुक्त उत्पन्नाचा स्लॅब वाढू शकतो

यावेळच्या बजेटमध्ये सरकार करमुक्त उत्पन्नाची व्याप्ती वाढवू शकते. सध्या लाखो लोकांना फक्त 2.5 लाख रुपयांपर्यंतच करमाफीचा लाभ मिळतो. ही मर्यादा 3 ते 5 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. यावेळी सरकार (Government) करोडो करदात्यांना मोठा लाभ देऊ शकते.

शेवटचा बदल 2014 मध्ये झाला होता

2014 मध्ये सरकारने कर मर्यादा वाढवली होती. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती, ती वाढवून 2.5 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना गुंतवणुकीसाठी अधिक पैसे मिळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT