PPF Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF: पीपीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, लक्षात ठेवा ‘हे’ नियम, नाहीतर होईल मोठे नुकसान

PPF खात्यात 15 वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घकालासाठी गुंतवणूक केल्यास त्याला मोठा फायदा होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public provident fund) योजनेत अनेक जण गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूकदारांना कसलीच जोखीम नाही. ही योजना कर मुक्त आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला कर सवलत आणि कमाल गुंतवणुकीची संधी मिळते. त्यामुळे ही योजना लोकप्रिय आहे. पण PPF खात्यातून रक्कम काढायची असेल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

PPF खात्यात 15 वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घकालासाठी गुंतवणूक केल्यास त्याला मोठा फायदा होतो. पीपीएफ खात्यात केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंत पण गुंतवणूक करता येते. नियमीत गुंतवणूकदारांसाठी पण योजनेत फायदा होतो.

पोस्ट खात्याच्या निर्देशानुसार, जर गुंतवणूकदाराला 15 वर्षापूर्वीच योजनेतून माघार घ्यायची असेल, खाते बंद करायचे असेल तर त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचे मोठे नुकसान होते.

  • जर मॅच्युरिटी लवकर संपली तर पीपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी नियम तयार करण्यात आले आहे.15 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच रक्कम काढता येते. जर तुम्ही 15 जून 2010 रोजी गुंतवणूक केली असेल तर 1 एप्रिल, 2026 रोजी मॅच्युरिटी पूर्ण होते. या योजनेत मुदत वाढीची संधी मिळते. गुंतवणूकदाराला वाटल्यास तो योजना वाढवू शकतो. त्याला पुढील पाच वर्षांकरीता योजनेत अतिरिक्त गुंतवणूक करता येते.

  • पीपीएफ खात्यातून सात वर्षांनंतर 50 टक्के रक्कम काढता येते. तुम्ही या खात्यातून दरवर्षी ठराविक रक्कम काढू शकतात. रक्कम काढण्यासाठी तुम्हाला पीपीएफचे पासबूक आणि एक अर्ज टपाल खात्यात जमा करावा लागतो. जर दीर्घकालासाठी गुंतवणूक करताना तुम्हाला रक्कमेची गरज पडली तर ती काढता येते. 15 वर्षांपूर्वी रक्कम काढली. पीपीएफ खाते बंद केले तर त्यासाठी अटी व नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये व्याज कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT