Impact of Ram Mandir Inauguration on Share market Dainik Gomantak
अर्थविश्व

Ram Mandir: प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा 'या' शेअर्सवर प्रभाव, एका महिन्यात दिला 150 टक्के परतावा

Ram Mandir And Share Market: अयोध्येतील छोट्या व्यापाऱ्यांसोबतच अनेक मोठ्या कंपन्यांना येथे व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माण आणि पर्यटनाशी संबंधित अनेक शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

Ashutosh Masgaunde

Impact of Ram Mandir Inauguration on Share market, 5 stockes given more than 150 percent returns in one month:

सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली. यानंतर प्रभू रामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येतील, त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास आहे.

अयोध्येतील छोट्या व्यापाऱ्यांसोबतच अनेक मोठ्या कंपन्यांना येथे व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माण आणि पर्यटनाशी संबंधित अनेक शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

एल अँड टी

नोव्हेंबर 2020 मध्ये श्री रामजन्मभूमी मंदिर प्रकल्प मिळाल्यानंतर, L&T च्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 17 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत 1,080 रुपये होती. जी आज वाढून 3,605 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या तीन वर्षांत स्टॉकने सुमारे 233 टक्के परतावा दिला आहे.

पक्का लिमिटेड

स्मॉल कॅप स्टॉक पक्का लिमिटेडच्या शेअर्सने यावर्षी जानेवारीमध्ये 150 टक्के परतावा दिला आहे. 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठासाठी कंपोस्टेबल प्लेट्स, वाट्या आणि चमचे पुरवण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

कामत हॉटेल

कामत हॉटेलच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा महिन्यांत ४८ टक्के परतावा दिला आहे. कंपनीने अयोध्येत 50 खोल्यांचे हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे.

प्रावेग 

कंपनीने अयोध्येत एक लक्झरी टेंट रिसॉर्ट उघडले आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

SIS लिमिटेड

खाजगी सुरक्षा एजन्सी SIS लिमिटेड मध्ये 18 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला राम मंदिर संकुलातील सुरक्षेचे कंत्राट राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT