If you lose your job don't be sad, even after this you can get Covid Advance  Dainik Gomantak
अर्थविश्व

नोकरी गमावल्यास दुःखी होऊ नका! यानंतरही...

आता 6 कोटी ईपीएफ ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. कोणी नोकरी गमावली असतानाही याचा फायदा घेता येतो.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीशी लढण्यासाठी, सरकारने नोकरदार लोकांना ईएफपी (EFP) कोविड ॲडव्हान्स घेण्याची सुविधा दिली आहे. आता 6 कोटी ईपीएफ ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. कोणी नोकरी गमावली असतानाही याचा फायदा घेता येतो.

नोकरी गमावल्यानंतरही कोविड ॲडव्हान्स मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओ (EPFO) सदस्याने नोकरी सोडल्यानंतरही कोविड ॲडव्हान्सचा लाभ घेण्याची परवानगी दिली आहे. ईपीएफओने दिलेल्या या सवलतीनुसार, जर एखाद्या सदस्याची नोकरी गेली असेल आणि तो अजूनही नोकरीच्या शोधात असेल, तर या काळात तो कोविड ॲडव्हान्स (PF Covid Advance) म्हणून पीएफ निधीचा काही भाग काढू शकतो.

एवढी मिळणार रक्कम

कर्मचारी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या रकमेपर्यंत किंवा सदस्याच्या ईपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 75 टक्के पर्यंत, जे कमी असेल ते 3 महिन्यांसाठी पीएफ काढू शकतो. पीएफ शिल्लकमध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघांचे योगदान समाविष्ट आहे. त्याच्या योगदानावर प्राप्त व्याज देखील यात समाविष्ट आहे.

पीएफ ॲडव्हान्सचा अर्ज करण्यासाठी, कर्मचारी ईपीएफ इंडियाच्या वेबसाइटवर लॉग इन करून तसेच तुमच्या फोनवरून पोर्टलद्वारे अर्ज करून हे काम करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जरी तुम्ही वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही गरजांसाठी आधी पीएफ ॲडव्हान्स घेतला असला तरीही तुम्ही हे ॲडव्हान्स घेऊ शकता. ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफ योजनेअंतर्गत मिळालेले कोणतेही ॲडव्हान्सवर इनकम टॅक्स नाही लागत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT