Hindustan Aeronautics Limited Dainik Gomantak
अर्थविश्व

संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डर मिळताच ‘या’ सरकारी कंपनीचा मोठा रेकॉर्ड; 20 हजार कोटींची केली कमाई

Hindustan Aeronautics Limited: संरक्षण मंत्रालयाकडून 156 हेलिकॉप्टरची ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली होती.

Manish Jadhav

Hindustan Aeronautics Limited: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL वर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कंपनीच्या शेअर्संनी नवा रेकॉर्ड केला. अवघ्या अर्ध्या तासात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 20 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. खरे तर, संरक्षण मंत्रालयाकडून 156 हेलिकॉप्टरची ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली होती. त्यानंतर मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. गेल्या एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीच्या शेअर्संनी विक्रमी पातळी गाठली

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे ​​शेअर बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासात विक्रमी पातळीवर पोहोचले. ट्रेडिंग सत्रादरम्यान, HAL शेअर्संनी 5496.95 रुपयासह 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 5199.60 रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 5.71 टक्के म्हणजेच 297.35 रुपयांपर्यंत वाढ झाली. तज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.

सद्यस्थिती काय आहे?

कंपनीच्या शेअर्सच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, सकाळी 10:10 वाजता कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5458.85 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मात्र, शेअरची ओपनिंग 5460 रुपयांनी तेजीने झाली. जी आधीच अपेक्षित होती. तथापि, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 5390 रुपयांसह लोअर लेवलवरही देखील पोहोचले होते.

एका वर्षात 180 टक्के परतावा

गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाल्यास, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीने NSE वर एका वर्षात गुंतवणूकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 94 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना (Investors) 95 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. लवकरच कंपनीचा परतावा चालू वर्षात 100 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

अर्ध्या तासात 20 हजार कोटींचा नफा

एचएएलच्या शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. माहितीनुसार, कंपनीचे मार्केट कॅप शुक्रवारी 3,47,736.24 कोटी रुपये होते, जे स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर 3,67,622.26 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 19,886 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर बाजार विक्रमी पातळीवर

दुसरीकडे, मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 315.84 अंकांच्या वाढीसह 77,308.61 अंकांवर व्यवहार करत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान सेन्सेक्सने 77366.77 अंकांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला. दुसरीकडे, निफ्टीमध्येही वाढ होताना दिसत आहे. सध्या निफ्टी 94 अंकांच्या वाढीसह 23,559.75 अंकांवर व्यवहार करत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, निफ्टीने 23,579.05 अंकांची नवीन जीवनकालीन उच्चांक गाठली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT