Hero Motocorp xpulse 210 xtreme 250r Bookings Open
हिरो मोटोकॉर्पने XPulse 210 आणि Xtreme 250R साठी बुकिंग सुरु केले आहे. तुम्ही अवघे 10,000 भरुन या बाईक्स बुक करु शकतात. या शानदार बाईक्स इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये लॉन्च करण्यात आल्या होत्या. या पहिल्यांदा EICMA 2024 मध्ये सादर करण्यात आल्या होत्या. दोन्ही बाईक्सची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे.
दरम्यान, XPulse 210 ची सुरुवातीची किंमत 1.75 लाख (एक्स-शोरुम) होती, जी Hero XPulse 200 4V पेक्षा सुमारे 24,000 जास्त आहे. ही क्लासिक बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये बेस मॉडेल आणि प्रीमियम व्हर्जनचा समावेश आहे. प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 1.86 लाख (एक्स-शोरुम) आहे. याशिवाय, Xtreme 250R ची 1.80 लाख (एक्स-शोरुम) किमतीत उपलब्ध आहे.
एक्सपल्स 210 मध्ये 210 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय, असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील आहे. हे इंजिन 24.6 बीएचपीची पॉवर आणि 20.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. अपेक्षेप्रमाणे, नवीन XPulse 210 ही XPulse 200 4V पेक्षा अधिक शक्तिशाली आहे. दुसरीकडे, हिरो एक्स्ट्रीम 250 आर ही ओईएमच्या नवीन 250 सीसी प्लॅटफॉर्मवर आधारित एक नेकेड स्ट्रीटफायटर आहे. ही 250 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे सपोर्टेट आहे, जी 29.58 बीएचपी पीक पॉवर आणि 25 एनएम टॉर्क जनरेट करते.
XPulse 210 ही कावासाकी KLX 230 सारख्या कॉम्पीटीटरशी स्पर्धा करेल, जी भारतातील एकमेव दुसरी ड्युअल-स्पोर्ट मोटरसायकल आहे. दरम्यान, Xtreme 250R ची स्पर्धा Keeway K300 SF, Bajaj Dominar 250, Bajaj Pulsar NS400Z, Suzuki Gixxer 250 आणि Honda CB300F सारख्या बाईक्सशी होईल. XPulse 210 आणि Xtreme 250R दोन्ही प्रीमियम डीलरशिपचे नेटवर्क असलेल्या Hero Premia स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील.
Xtreme 250R मध्ये LED लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नेव्हिगेशनसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाईल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी USB पोर्ट आणि बरेच काही फिचर्स देण्यात आले आहे. XPulse 210 मध्ये पूर्णपणे LED लाइटिंग, टेल रॅक आणि मोबाईल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी USB पोर्ट देखील आहे. व्हेरिएंटनुसार TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किंवा LCD युनिट आहे. नेव्हिगेशनसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे. एक्सपल्स 210 चार अल्पाइन सिल्व्हर, वाइल्ड रेड, अझ्युर ब्लू आणि ग्लेशियर व्हाइट या चार कलरच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर एक्सट्रीम 250 आर तीन कलरमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये फायरस्टॉर्म रेड, स्टील्थ ब्लॅक, निऑन शूटिंग स्टार यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.