HDFC Bank
HDFC Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC ने पॉलिसीधारकांना दिली भेट, कंपनीने जाहीर केला बोनस

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही एचडीएफसी लाइफ (HDFC Life) या खाजगी क्षेत्रातील जीवन विमा कंपनीची (Life Insurance Company) जीवन विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. HDFC लाइफ त्यांच्या 5.87 लाख पॉलिसीधारकांना जबरदस्त बोनस देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. HDFC लाइफने त्यांच्या पार्टिसिपेटिंग प्लॅनवर दिलेला हा सर्वोच्च बोनस आहे. (HDFC Life gift to policyholders, the company announced a bonus)

पॉलिसीधारकांना 2465 कोटींचा बोनस

HDFC लाइफ तिच्या 5.87 लाख पॉलिसीधारकांना 2465 कोटी रुपयांचा बोनस देणार असल्याचे सांगितले जात आहे. या रकमेपैकी 1,803 कोटी रुपये पॉलिसीधारकांना या आर्थिक वर्षात पॉलिसीच्या परिपक्वतेवर रोख बोनसच्या रूपात दिले जाणार आहेत.

थकबाकी बोनस विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर किंवा पॉलिसीधारकांच्या मृत्यूनंतर किंवा पॉलिसी सरेंडर केल्यावर दिला जाणार आहे. या बोनसची घोषणा करताना, एचडीएफसी लाइफचे एमडी-सीईओ विबा पडळकर म्हणाले की, कंपनीने देऊ केलेला आत्तापर्यतचा हा सर्वोच्च बोनस आहे. आम्ही वर्षानुवर्षे बोनस देत आहोत.

शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून 29 टक्क्यांनी घसरले,

एचडीएफसी लाइफने 2000 मध्ये विमा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यानंतर विमा क्षेत्रामध्ये प्रवेश केला. HDFC जीवन संरक्षण, बचत, गुंतवणूक, वार्षिकी आणि आरोग्य योजना ऑफर करत आहे.

सध्या एचडीएफसी लाईफचा शेअर 554 रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअरनेही 775 रुपयांचा उच्चांक गाठलेला आहे. मात्र या स्तरावरून बाजारातील घसरणीमुळे जवळपास 29 टक्के शेअरमध्ये घसरण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT