HDFC- HDFC Bank Merger: गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC लिमिटेडचे आज म्हणजेच 1 जुलैपासून HDFC बँकेत विलीनीकरण झाले आहे. गेल्या शुक्रवारी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने विलीनीकरणाला अंतिम मंजुरी दिली. यामुळे HDFC लिमिटेडचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले आहे.
विलीनीकरणानंतर एचडीएफसी आता जेपी मॉर्गन, आयसीबीसी आणि बँक ऑफ अमेरिका नंतर बाजार मूल्यानुसार जगातील चौथी सर्वात मोठी बँक झाली आहे.
HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचे विलीनीकरण देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठा करार आहे. याचा आकार 40 अब्ज डॉलर्स आहे. विलीनीकरणानंतर नव्याने अस्तित्वात आलेली कंपनी देशातील सर्वात मोठी वित्तीय सेवा फर्म बनली आहे. त्याची एकूण मालमत्ता 18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
शेअर बाजारात काय बदल होईल: बीएसई निर्देशांकात नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे वेटेज रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा जास्त असेल. सध्या रिलायन्सचे वेटेज 10.4 टक्के आहे, परंतु विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज 14 टक्क्यांच्या जवळपास असेल. या डील अंतर्गत HDFC च्या प्रत्येक शेअरहोल्डरला 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील.
शुक्रवारी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 9,51,584 कोटी होते, तर HDFC Ltd चे मार्केट कॅप रु 5,22,368.64 कोटी होते. विलीनीकरणामुळे HDFC चे मार्केट कॅप 14,73,953 कोटी रुपये होईल. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर, एचडीएफसी बँक मार्केट कॅपनुसार देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 17,25,704.60 कोटी रुपये आहे.
विलीनीकरणानंतर, एचडीएफसी सिक्युरिटीज, एचडीएफसी एएमसी, एचडीएफसी अॅग्रो जीआयसी, एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायझर्स आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स एचडीएफसी बँकेच्या उपकंपन्या बनतील. याचा परिणाम कंपनीच्या शेअरच्या किमतीवर होतो.
दरम्यान, विलीनीकरणापूर्वी एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.