HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढले HDFC बँकेच्या FD चे व्याजदर

HDFC बँकेने एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचून तुम्ही नक्कीच खूश ह्वाल. होय, खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 17 जून 2022 पासून वेगवेगळ्या मुदतींच्या मुदत ठेवींवर (FDs) वाढवलेले नवीन व्याज दर देखील लागू केले आहेत ज्याची रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असणार आहे. (HDFC Bank FD interest rate rises for second time in a week)

एचडीएफसी बँकेने एनआरओ आणि एनआरई मुदत ठेवींसाठी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा लाभ अनिवासी भारतीयांनी केलेल्या एफडीवर मिळणार नाही, याशिवाय NRE ठेवीचा कालावधी किमान 1 वर्षाचा असावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

कालावधी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी

व्याज दर (सामान्य नागरिकांसाठी) व्याजदर (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

7-14 दिवस 2.75% 3.25%

15 - 29 दिवस 2.75% 3.25%

30 - 45 दिवस 3.25% 3.75%

46 - 60 दिवस 3.25% 3.75%

61 - 90 दिवस 3.25% 3.75%

91 दिवस - 6 महिने 3.75% 4.25%

6 महिने 1 दिवस - 9 महिने 4.65% 5.15%

9 महिने 1 दिवस < 1 वर्ष 4.65% 5.15%

1 वर्ष 5.35% 5.85%

1 वर्ष 1 दिवस - 2 वर्षे 5.35% 5.85%

2 वर्षे 1 दिवस - 3 वर्षे 5.50% 6.00%

3 वर्षे 1 दिवस - 5 वर्षे 5.70% 6.20%

5 वर्षे 1 दिवस - 10 वर्षे 5.75% 6.50%

5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर आता 5.75 टक्के मिळणार व्याज

HDFC बँक 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 5.35 टक्के व्याज देते, तर 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. हे 3 वर्षे ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 5.70 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर बॅंक 5.75 टक्के व्याज देत आहे. देशात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाते.

रिझर्व्ह बँकेने 8 जून रोजी रेपो दरात वाढ केली होती,

8 जून रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये वाढ केल्यापासून देशातील सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी, आरडी आणि बचत खात्यांवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज देण्यास सुरुवात केली. तसेच, अनेक बँकांनी बचत खात्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात बदल केलेला नाही किंवा अगदी किरकोळ बदल करण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Bank Of India) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 जून रोजी रेपो दरात 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांपर्यंत 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याची घोषणा केली होती, तसेच आरबीआयच्या या घोषणेनंतर सर्व बँकांनी कर्जाचे व्याजदरही वाढवले ​​आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

Nikolai Patrushev Goa visit: गोव्याच्या सागरी क्षेत्रातील प्रगतीची रशियाकडून प्रशंसा! रशियाचे राष्ट्रपती साहाय्यक निकोलाईंनी दिली भेट

IFFI 2025: 'गोव्यात या, चित्रीकरण करा'! CM सावंतांचे आवाहन; राज्‍याला चित्रपट निर्मिती हब बनवण्‍याचे स्‍वप्‍न

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मोठा फेरबदल! 34 पोलिस निरीक्षक, 6 उपअधीक्षकांच्या बदल्या; उत्तर गोव्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांचीही उचलबांगडी

Horoscope: महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या; घाई करू नका! महत्वाचे निर्णय इतरांना सांगू नका.. वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT