Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: महिलांना लागली लॉटरी! सरकार दरमहा देणार एवढे रुपये; असा करा अर्ज

Government Scheme Update: केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामधून तुम्हाला आर्थिक मदत मिळते.

Manish Jadhav

Government Scheme Update: केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळते. आता महिलांना सरकारकडून दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत.

सरकार महिलांसाठी वेळोवेळी योजना राबवत असते. आतापासून या महिलांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची भेट मिळाली आहे. मात्र, कोणत्या महिला त्याचा लाभ घेऊ शकतात ते जाणून घेऊया...

ही विशेष योजना सुरु झाली

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी महिलांसाठी एक घोषणा केली आहे. ज्या अंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील.

सरकारने महिलांसाठी 'लाडली लक्ष्मी योजना' लागू केली आहे. त्यामुळे महिलांना खूप फायदा होईल. ही योजना विशेषत: महिलांना सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरुन महिलांना (Women) घर चालवणे सोपे जाईल.

लाडली लक्ष्मी योजना काय आहे?

ही योजना मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांना सक्षम आणि बळकट करण्यासाठी बनवली आहे. महिलांना कोणत्याही मदतीशिवाय मिळणाऱ्या रकमेतून घर चालवता येते.

ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि ज्यांच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांना प्रगत करण्यासाठी लाडली लक्ष्मी योजना ही योजना सुरु करण्यात आली आहे.

जाणून घ्या कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ-

1. या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील महिलाच घेऊ शकतात.

2. अर्जासाठी महिलांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

3. शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

4. ही विशेष योजना फक्त मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांसाठी करण्यात आली आहे.

5.10 जूनपासून महिलांच्या खात्यात पैसे येणे सुरु होईल.

6. अर्जासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. पासपोर्ट आकाराचा फोटो

3. बँक खाते तपशील

4. मोबाईल क्रमांक

5. निवास प्रमाणपत्र

6. जन्म प्रमाणपत्र

अर्ज कसा करायचा

या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावणार आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरुन या योजनेसाठी अर्ज करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT