Google Removed 2500 Fraud Loan Apps Dainik Gomantak
अर्थविश्व

Fraud Loan Apps: गुगलची मोठी कारवाई, 2,500 ॲप्स Play Store वरुन हटवली

Google Removed 2500 Fraud Loan Apps: तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Google Removed 2500 Fraud Loan Apps: तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्याची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. ऑनलाइन फसवणुकीबाबत आता सरकार कठोर झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. या संदर्भात नुकतेच भारत सरकारने गुगलला प्ले स्टोअरवरुन फ्रॉड लोन ॲप्स काढून टाकण्याचे आवाहन केले होते. सरकारच्या मागणीवर कारवाई करत गुगलने प्ले स्टोअरवरुन जवळपास 2,500 ॲप्स काढून टाकली.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलेल्या ॲप्सबाबत माहिती दिली. सीतारामन यांनी सांगितले की, सरकार बऱ्याच काळापासून फ्रॉड लोनसंबंधी ॲप्स काढून टाकण्याचा विचार करत होते. काढण्यात आलेल्या ॲप्सच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असे.

रिझर्व्ह बँकेने ही लिस्ट जाहीर केली

अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, आरबीआयने या ॲप्सची व्हाइट लिस्ट जारी केली होती. ही लिस्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने Google सोबत शेअरही केली होती. अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, फ्रॉड लोन ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या सहकार्याने काम करत आहे. Google ने Play Store वरुन काढून टाकलेले 2,500 अॅप्स एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान काढून टाकण्यात आली. या सर्व ॲप्सच्या माध्यमातून कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत होती. सरकार आता सर्व प्रकारच्या लोन ॲप्लिकेशनवर लक्ष ठेवत आहे. तुम्हीही अशा प्रकारचे कोणतेही ॲप वापरत असाल तर ते तुमच्या फोनमधून लगेच डिलीट करा.

Google अपडेट केलेले धोरण

गुगलने लोन देणाऱ्या ॲप्सचे धोरण बदलले आहे. गुगलने काही नवीन नियम जोडले आहेत. लोकांना कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या Google Play Store वर उपलब्ध अशा सर्व ॲप्ससाठी नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. Google ने सुमारे 3500 फ्रॉड लोन ॲप्स ओळखली आहेत, त्यापैकी 2500 ॲप्स काढून टाकण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; संबंधितांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

कोरोना व्हायरस करु शकतो कॅन्सरग्रस्त रुग्णांचा इलाज? नव्या अभ्यासाने डॉक्टरही चकित; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT