Google Doodle Celebrating Panipuri: गुगलने बनवले पाणीपुरीचं खास डूडल, युजर्सला दिला मजेदार टास्क

कोणासाठी पाणीपुरी, गोलगप्पा, गुपचुप म्हणून ओळखला जाणारा चटपटीत पदार्थाची क्रेझ जगभरात आहे.
panipuri Benefits
panipuri BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Google Doodle Celebrating Panipuri: पाणीपुरीचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. भारतात पाणीपुरीची क्रेझ तुम्हाला दररोज संध्याकाळी बाजारांमध्ये पाहायला मिळते. पाणीपुरीच्या स्टॉलवर लोकेची गर्दी पाहायला मिळते. गुगलही हे स्ट्रीट फूड खास पद्धतीने साजरा करत आहे. 

गुगलने डूडलच्या माध्यमातून एक गेमही आणला आहे. ज्यामध्ये . युजर्सला रस्त्यावरील विक्रेत्याला म्हणजेच पाणीपुरी बनवणाऱ्याला मदत करण्यास सांगितले आहे. त्यात पाणीपुरीशी संबंधित सर्व सामग्री गुगलमध्ये आहे. या खास गेममध्ये पाणीपुरी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये असून ग्राहकांच्या चव आणि मागणीनुसार पाणीपुरी बनवणाऱ्याला मदत करण्याचे टास्क देण्यात आले आहे. 

हा दिवस साजरा करण्यामगचे कारण म्हणजे 2015 साली याच दिवशी (12 जुलै) मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका रेस्टॉरंटने 51 विविध प्रकारचे पाणीपुरीतील पाणी देण्याचा विक्रम रचला होता. या रेस्टॉरंटने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे. दक्षिण आशियाई भागातील हाच सर्वांचा आवडता पदार्थ म्हणून गुगल डूडलद्वारे साजरा करत आहे.

  • गुगलचा युजर्संसाठी खास टास्क

गुगलने डूडलच्या माध्यमातून एक गेम देखील आणला आहे. ज्यामध्ये युजरला स्ट्रीट व्हेंडरला मदत करण्यास सांगण्यात आले आहे. या खास गेममध्ये पाणी पूर्णपणे वेगळ्या फ्लेवर्समध्ये असून ग्राहकांच्या चवीनुसार आणि मागणीनुसार पाणी बनवणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याचे काम देण्यात आले आहे. तुम्हाला फक्त त्या पाणीपुरीवर क्लिक करायचे आहे.

  • पाणीपुरीता इतिहास

पौराणिक कथेनुसार, पाणीपुरीचा शोध द्रौपदीने महाभारत काळात लावला होता. कथा अशी आहे की द्रौपदी पांडवांची पत्नी झाली तेव्हा पाचही भाऊ मर्यादित साधनांसह वनवासात राहत होते.

द्रौपदीची सासू कुंतीने तिला उरलेली बटाट्याची करी आणि गव्हाचे पीठ वापरून पाचही पुरुषांची भूक भागेल असे काहीतरी बनवायला सांगितले. द्रौपदीने बनवलेली डिश एक लहान आकाराची पाणीपुरी होती, ज्यामुळे पांडवांची भूक भागली.

हे लोकप्रिय स्ट्रीट फूडमध्ये अनेक प्रकार आहेत आणि ते देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये, पाणीपुरी म्हणून ओळखले जाते. सामान्यतः उकडलेले चणे, पांढरे वाटाणे आणि मसालेदार पाण्याने कोंब यांच्या मिश्रणात बुडविले जाते.

पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि नवी दिल्ली उत्तर भारतीय राज्यांप्रमाणेच, गोल गप्पा म्हणजे बटाटा, जलजीरा-स्वादयुक्त पाण्यात मिसळलेले स्ट्रीट फूड होय. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगाल आणि बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये, पुचका किंवा फुचका नावाच्या स्ट्रीट फूडमध्ये मुख्य घटक म्हणून चिंचेचा कोळ असतो.

  • पाणीपुरी खाण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी पाणीपुरीचे (Panipuri) पाणी किती फायदेशीर ठरते. खर तर जिरं आणि पुदिन्याचे पाणी पिल्याने वजनावर नियंत्रण ठेवता येते. पण पाणीपुरीच्या पाण्यामध्ये आलु, पुदिना, काळे मीठ, जिरं यासारखे पदार्थ असतात. पण घरी पाणी तयार केल्यावर आपल्या वाटेल त्या प्रमाणात पदार्थ टाकता येतात. पाणीपुरीच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते. मिठाचे अधिक सेवन आरोग्यासाठी घटक ठरू शकते.पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना असतो. पुदिन्यांचे पाणी पिल्याने वजन नियंत्रित करता येते. कारण पुदिन्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, लोह,मॅंगनीज असते यामुळे पचन संस्था सुरळीत कार्य करते आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते.पाणीपुरीकच्या पाण्यात जीर आणि पुदिना असल्याने आपली पचनशक्ती सुरळीत राहते. पण रोज तेलकट आणि मैद्याची पुरी खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे पाणीपुरी खाण्यापेक्षा पाणीपुरीचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com