Google: युजरची लोकेशन ट्रॅक करणे गुगलला पडले महागात! भरावा लागणार कोटींचा दंड

Google: मात्र आपण परवानगी नाकारल्यानंतरही गुगल आपली लोकेशन ट्रॅक करणे बंद करत नसल्याचे दिसून आले आहे.
Google
GoogleDainik Gomantak
Published on
Updated on

Google: गुगलला एका युजरची लोकेशन ट्रॅक केल्याप्रकरणी मोठा दंड भरावा लागल्याची माहीती समोर आली आहे. गुगल नेहमी आपल्याला लोकेशन अॅक्सेससाठी परवानगी मागते.

जर ती परवानगी आपण दिली तर गुगल आपली लोकेशन ट्रॅक करत असते. मात्र जर आपण ही परवानगी नाही दिली गुगल लोकेशन ट्रॅक करु शकत नाही, असे गुगलकडून माहीती दिली जाते. मात्र आपण परवानगी नाकारल्यानंतरही गुगल आपली लोकेशन ट्रॅक करणे बंद करत नसल्याचे दिसून आले आहे.

कॅलिफोर्नियाचे अटॉर्नी जनरल, रॉब बोंटा यांनी गुगलवर आरोप करत म्हटले आहे की, गुगल वापरकर्त्यांची फसवणूक करत आहे. गुगल वापरकर्त्यांना असे सांगतो जर तुम्ही लोकेशन अॅक्सेसची परवानगी नाकारली तर गुगल पून्हा तुमची लोकशन ट्रॅक करणार नाही.

प्रत्यक्षात मात्र गुगल स्वत:च्या फायद्यासाठी वापरकर्त्यांचा डाटा मिळवण्यासाठी लोकेशन ट्रॅक करणे बंद करत नसल्याचे आमच्या पडताळणीतून समोर आले आहे. आता याचा दंड म्हणून कंपनीला $93 मिलियन दंड भरावा लागणार आहे जो 7,000 कोटी इतका आहे.

Google
Viral Video: विमानतळावर सिक्युरिटी स्टाफकडून प्रवाशांच्या सामान आणि पैशावर डल्ला

गुगल हे आरोप मान्य करत नसल्याची नसल्याची माहीती मिळाली आहे. मात्र हा वाद जास्त वाढू नये यासाठी गुगलने हा दंड भरण्याचे वचन दिले आहे. गुगलच्या प्रवक्त्याने आम्ही या प्रकरणातून मार्ग काढला आहे. जून्या पॉलीसीनुसार जे काम केले जात होते त्यावर हे आरोप केले जात होते मात्र आम्ही या पॉलीसीमध्ये बदल केला असल्याचे म्हटले आहे.

गुगलला काय होतो फायदा?

गुगल वापरकर्त्यांच्या लोकेशनद्वारे मिळालेल्या माहीतीचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा करुन घेऊ शकते. तुम्ही अनेकदा हे अनुभवले असेल तुम्ही एखाद्या वस्तूची दुकानातून खरेदी केली तर तुम्हाला त्याप्रकारच्या जाहीराती तुम्हाला मोबाईल दिसू लागतात. मात्र यामुळे वापरकर्त्यांच्या खाजगीपणावर गदा येते. समोर आलेल्या या प्रकरणामुळे गुगलला वापरकर्त्याचे लोकेशन ट्रॅक करण्याचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले आहे.

आता गुगल वापरकर्त्यांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांची लोकेशन ट्रॅक करणे बंद करणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com