Farmer
Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Nidhi: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 13 व्या हप्त्यापूर्वीच मिळाली 3000 रुपयांची भेट!

Manish Jadhav

PM Kisan Nidhi: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापासून पीएम किसान योजनेसोबत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर करेल. केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांचे करोडोंचे उत्पन्न वाढत आहे.

खात्यात पैसे येतील

पीएम किसान योजनेसोबतच प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील सुरु करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. पीएम मानधन योजनेंतर्गत सरकार (Government) दरमहा 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे.

शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन मिळेल

या योजनेत शेतकऱ्यांना (Farmer) दरमहा 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेचा प्रीमियम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेतूनच कापला जातो, परंतु यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागेल.

दरमहा किती पैसे द्यावे लागतील?

जर शेतकऱ्यांना या पेन्शन योजनेत मासिक 55 ते 200 रुपये भरावे लागतील आणि तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी पोहोचाल, तर त्यानंतर दरमहा तुमच्या खात्यात 3000 रुपये पेन्शन येऊ लागेल. 18 ते 40 वयोगटातील कोणीही सहभागी होऊ शकतो.

या योजनेचे काय फायदे आहेत?

भारतातील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 36 हजार रुपये दिले जातात. 40 वर्षांपर्यंतचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला या योजनेत पैसे जमा करावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

Valpoi Hegdewar High School: डॉ. हेडगेवार हायस्कूलला विश्वजीत राणेंकडून दोन कोटींची देणगी जाहीर

SCROLL FOR NEXT