Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan च्या 14 व्या हप्त्यापूर्वी कृषीमंत्र्यांनी दिली गुड न्यूज, शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले

PM Kisan 14th Instalment: देशभरातील शेतकऱ्यांना फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता मिळाला आहे.

Manish Jadhav

PM Kisan 14th Instalment: देशभरातील शेतकऱ्यांना फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता मिळाला आहे. त्यांच्या खात्यात हप्त्याचे पैसे आल्यानंतर 14 व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली असून त्याची प्रतीक्षा आहे.

मात्र त्याआधीच कृषीमंत्र्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रधानमंत्री फसल बिमा पोर्टल अंतर्गत डिजीक्लेम अॅप लाँच केले आहे.

1,260.35 कोटी रुपयांचे क्‍लेम भरले

डिजीक्लेम अॅपद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याचा तात्काळ क्‍लेम करण्याची आणि क्‍लेमचे पैसे मिळण्याची सुविधा मिळणार आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या कालावधीत, कृषीमंत्र्यांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि हरियाणा (Haryana) येथील विमाधारक शेतकर्‍यांचे 1,260.35 कोटी रुपयांचे विमा क्‍लेम डिजिक्लेम प्लॅटफॉर्मद्वारे ट्रान्सफर केले.

ऑनलाइन ट्रॅकिंग सुविधा

शेतकऱ्यांच्या (Farmers) वतीने क्‍लेम केल्यानंतर, डिजीक्लेमद्वारे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम आपोआप अदा केली जाईल. यासोबतच शेतकरी बांधवांना त्याचा ऑनलाईन पाठपुरावाही करता येणार आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले की, सध्या 6 राज्यांतील शेतकऱ्यांना सुरुवातीला डिजीक्लेमचा लाभ मिळू शकेल. या राज्यांमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि हरियाणा यांचा समावेश आहे.

विविध कारणांमुळे क्लेमला उशीर

सध्याच्या व्यवस्थेमध्ये विविध कारणांमुळे विमाधारक शेतकऱ्याला क्‍लेम मिळण्यास विलंब होतो. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. क्लेम सेटलमेंटला गती देण्यासाठी डिजीक्लेम सुरु करण्यात आले आहे.

डिजीक्लेम लॉन्च प्रसंगी कृषी मंत्री तोमर म्हणाले की, आमच्या मंत्रालयासाठी ही अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे.

यानंतर शेतकऱ्यांचे क्‍लेम वेळेवर आणि स्वयंचलित पद्धतीने डिजिटल पद्धतीने सादर केले जातील. यामुळे, शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम बनतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT