PhonePe Job Vacancies 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! PhonePe तर्फे 2800 जागांसाठी बंपर ऑफर

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील एकूण कर्मचारी 5,400 पर्यंत दुप्पट करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील एकूण कर्मचारी 5,400 पर्यंत दुप्पट करणार आहेत. कंपनीची कर्मचारी संख्या सध्या 2,600 आहे. कंपनी पुढील 12 महिन्यांत बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशातील इतर भागांमध्ये सुमारे 2,800 लोकांना विविध पदांवर नियुक्त (Jobs) करण्याची योजना आखत असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली. (golden opportunity for job seekers PhonePe offers bumper offers for 2800 seats)

अभियांत्रिकी, उत्पादन, विश्लेषण, व्यवसाय विकास आणि विक्री संघ पदांवर या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना मार्केट स्टँडर्डपेक्षा जास्त पगाराचे पॅकेज ऑफर केल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी आहे. (PhonePe Job Vacancies)

ही कंपनी एम्प्लॉई शेअर ओनरशिप स्कीम (ESOP) द्वारे सर्व कर्मचार्‍यांना संपत्ती निर्मितीची संधी देखील प्रदान करते. PhonePe चे मानव संसाधन प्रमुख मनमीत संधू म्हणाले, "आम्ही एक दीर्घकालीन शाश्वत संस्था तयार करत आहोत जी तंत्रज्ञानाद्वारे चालविली जाते आणि सर्वांसाठी मूल्य निर्माण करते." त्यामुळे सध्या जे नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोव्याला आघाडी; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

Suryakumar Yadav: 'मिस्टर 360, माझी मदत कर...' सूर्यकुमार यादवने डिव्हिलियर्सकडे मागितली मदत, फलंदाजीत होणार मोठे बदल?

Shocking: क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिट'

SCROLL FOR NEXT