Gold canva
अर्थविश्व

दोन महिन्यांच्या पडझडीनंतर सोन्याच्या भावात वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा ऑगस्ट फ्यूचर्स 41 रुपयांनी वाढून सध्या 46,911 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेडिंग करीत आहे.

Dainik Gomantak

सोन्याच्या किंमतींमध्ये मागील काही काळापासून निरंतर घट होताना दिसत आहे. सध्या सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यात सर्वात कमी झाले आहे. सोन्याच्या किंमतीत शुक्रवारी प्रति दहा ग्रॅम 40 रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीसह, 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 46,190 रुपये झाली असून प्रती 10 ग्रॅम सोन्याच्या 24 कॅरेटची किंमत 47,190 रुपये इतकी झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा ऑगस्ट फ्यूचर्स 41 रुपयांनी वाढून सध्या 46,911 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेडिंग करीत आहे. मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. ऑगस्ट 2020 मध्ये, MCX वर प्रती 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली असतानाच आज ऑगस्ट फ्युचर्स MCX ला सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,911 रुपयांच्या पातळीवर आहे. म्हणजेच ते अजूनही 10,000 रुपयांनी स्वस्त होत आहे.

मुंबईतील 22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या प्रति 10 ग्रॅम 46,190 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत सध्या प्रति 10 ग्रॅम 47,190 रुपये इतकी झाली आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,400 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,440 रुपये आहेततर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,150 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,250 रुपयांवर उपलब्ध आहेत. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये सोन्याचा दारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT